शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अर्धविराम लावून आपणही थोडे थांबायला काय हरकत आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 07:19 IST

सध्याच्या अस्वस्थ कोरोना काळात आधीच दुबळ्या झालेल्या मन:शांतीचा क्रमांक एकचा शत्रू समाजमाध्यमे आहेत.

कोरोनाने जगाचे वेगवान रहाटगाडगे सक्तीने थोपवून धरलेले असताना नाइलाजाने का असेना, आपल्याला थोडी उसंत मिळालीआहे. डोक्यातल्या कोलाहलापुढे निदान अर्धविराम लावून आपणही थोडे थांबायला काय हरकत आहे? विखारापासून सुटका झाली, तरच हे घडू शकेल. आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने योगाभ्यास आणि मन:शांती याविषयावरील दोन महत्त्वाच्या समकालीन भाष्यकारांनी ‘लोकमत’च्या वेबिनारमध्ये आपल्या मनातली अस्वस्थता मोकळेपणाने मांडली. त्याची दखल येथे घेणे क्रम:प्राप्त आहे. त्यातले एक ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ या जागतिक ख्यातीप्राप्त संघटनेचे संस्थापक श्री श्री रविशंकर आणि दुसरे योगगुरू बाबा रामदेव! सध्याच्या अस्वस्थ कोरोना काळात आधीच दुबळ्या झालेल्या मन:शांतीचा क्रमांक एकचा शत्रू समाजमाध्यमे आहेत.आयुर्वेद आणि योगविद्या या प्राचीन भारतीय ज्ञानाच्या संचिताकडे दुर्लक्ष करून पश्चिमेच्या भजनी लागलेली आपली परावलंबी आरोग्य व्यवस्था आणि केवळ घोकंपट्टीचा रोग जडलेले आपले किरटे शिक्षण अशा दुर्धर दुखण्यांवर या दोघांनी नेमके बोट ठेवले आहे. श्री श्री रविशंकर आणि बाबा रामदेव हे दोघे तसे भिन्न स्वभावधर्माचे; पण कोरोना नावाच्या विषाणूशी चालू असलेली लढाई निभावताना आपण सर्वांनीच जो असह्य कलकलाट आरंभलेला आहे, तो थांबवा, असे या दोघांचेही अगदी कळकळीचे सांगणे होते. या कलकलाटाला, त्यातून हळूहळू येत चाललेल्या त्रासिक उद्विग्नतेला आणि आधीच घरकोंडीने घुसमटलेल्या सामान्यांच्या अस्वस्थ मनांना कारणीभूत आहेत ती अतिरेकी माध्यमे... आणि त्याहीपेक्षा समाजमाध्यमे!

दोन-चार महिने आमदनी थांबली म्हणून काही न बिघडणाऱ्या सुदैवीवर्गाने आधी समाजमाध्यमांवर ‘लॉकडाऊन लाईफस्टाईल’ची दुकाने मांडली. मग ‘डालगोना कॉफी’ आणि ‘बनाना ब्रेड’ न परवडणाऱ्यांनी या अभिजनांची धुलाई केली. छुपा मत्सर आणि त्यापोटी विखार हा तर समाजमाध्यमांचा स्वभावच. या विखाराचा हैदोस सध्या लोकांच्या डोक्यात घुसला आहे. सतत सल्ले तरी, नाही तर भीतीदायक अफवा तरी किंवा मग आत्महत्येपर्यंत नेवू पाहणाºया अस्वस्थतेचे आत्मरंजन तरी! त्यात दर मिनिटागणिक कानीकपाळी आदळणारे कोरोना विषाणूबाधितांचे, मृत्यूंचे वाढते आकडे! बरे, या नकोशा माहितीपासून स्वत:ला दूर ठेवण्याचे दोर सगळ्यांनी कधीच कापलेले... त्यामुळे हातातल्या त्या चौकोनी स्मार्ट डब्यातून नको ते सारे सतत डोळ्यांवर, मनांवर आदळत असतेच! हा अतिरेकी हैदोस आता तरी थांबवा, असा कळकळीचा सल्ला एरव्ही मितभाषी असलेल्या रतन टाटा यांच्यासारख्या आदरणीय व्यक्तित्त्वाला थेट इन्स्टाग्रामवर जाऊनच द्यावासा वाटला, यातच काय ते आले. टाटा म्हणतात, ‘हे वर्ष सगळ्यांसाठीच फार कठीण आहे. ही वेळ एकमेकांवर हल्ले चढवून विखारी निर्भत्सनेची नाही, आता आपण एकमेकांना सावरले पाहिजे. परस्परांविषयी आपल्या मनात सहानुभाव असला पाहिजे!’ एकमेकांच्या दु:खांची-अडीअडचणींची जाणीव असणे, अवघड वेळी न बोलता परस्परांना सांभाळून नेणे आणि आधीच भळभळत्या जखमेवर उगा बोट न दाबणे, ही माणूसपणाची अगदी प्राथमिक कर्तव्ये! पण त्याचाही अनेकांना विसर पडलेला आहे.
सर्दी-खोकल्याने बेजार केले तर हळद घालून गरम दूध पिण्याचे आपण केव्हा विसरलो आणि औषधाच्या दुकानांकडे कसे धावू लागलो; हा तर प्रश्नही हल्ली कुणाला पडत नाही. खरे तर ही दुखणी काही कोरोनाने आणलेली नाहीत. आपला समाज त्याने जर्जर आहेच. फक्त कोरोनाने वरवरचे बुरखे ओरबाडून काढल्यावर आता आत सडलेले समाजमन अधिकच उघडे पडत चालले आहे, एवढेच! हे सडणे इतके जीवघेणे आहे की, त्याने रतन टाटा यांच्यासारख्यालासुद्धा अस्वस्थ केले आहे. वरवरची एक खपली उकलली की, आत सारा असह्य कल्लोळच! कोरोना विषाणूने जगाचे रहाटगाडगे थोपवून धरलेले असताना सक्तीने का असेना, प्रत्येकाच्याच हाताशी काही रिकामा वेळ आला आहे. डोक्यातल्या कोलाहलापुढे पूर्ण नाही, निदान अर्धविराम लावून आपणही थोडे थांबायला काय हरकत आहे? श्री श्री रविशंकर, बाबा रामदेव आणि रतन टाटा हे तीन वेगवेगळ्या स्वभावधर्माचे लोक तेच तर सुचवत आहेत.

टॅग्स :YogaयोगInternational Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिन