शहरं
Join us  
Trending Stories
1
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
2
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
3
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
4
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
5
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
6
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
7
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
8
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
9
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
10
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
11
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
12
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
13
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
14
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
15
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
16
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
17
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
18
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
19
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
20
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत

जीव ओतून नरेंद्र मोदींसाठी काम केले, मग प्रशांत किशोर यांचे भाजपाशी का वाजले?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 6:09 AM

साखरपुड्यातच लग्न मोडले, पुन्हा नाते जुळेल? सारे काही संपलेले नाही असे सावध निवेदन प्रशांत किशोर व काँग्रेस अशा दोघांनीही दिले आहे. आगामी महिन्यात बोलण्यांची चौथी फेरी होऊ शकते.

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर ऊर्फ पीके आणि काँग्रेस यांच्यात होऊ घातलेली सोयरिक अखेर मोडली आहे. परस्परांना साथ देण्यासाठी बोहोल्यावर चढण्याचा दोघांचा हा तिसरा प्रयत्न होता, पण साखरपुड्यातच लग्न मोडले. तिसऱ्या वेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी पीकेंची थेट बोलणी चालली होती. त्या चर्चेच्या फेऱ्यांमध्ये इतर ज्येष्ठ नेते सामील होते, तरीही गाडे बिनसले. मिळालेल्या महितीनुसार यावेळी या चर्चासत्रांसाठी प्रियांका गांधी वड्रा यांनी पुढाकार घेतला होता. पीके यांची कॉंग्रेस पक्षाशी कोणतीच ध्येयधोरणात्मक बांधिलकी नसताना यावेळी पक्षाने स्वत:च दोन पावले पुढे टाकली होती. 

२०१४ साली मोदी यांच्याशी काडीमोड झाल्यावर २०१५ साली पीके यांनी नितीशकुमार यांच्याशी घरोबा केला. बिहारमध्ये भाजपला धूळ चारण्याचा त्यांचा मनोदय होता. नंतर २०१७ साली त्यांनी पंजाबात कॅ. अमरिंदरसिंग यांना मदत केली. आंध्रातील वायएसआर काँग्रेस, तेलंगणातील टीआरएस, तामीळनाडूत द्रमुक, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना पीकेंच्या रणनीतीने निवडणूक जिंकायला मदत केली. या ठिकाणी मिळालेल्या यशामुळे निवडणूक रणनीतीकार म्हणून पीके यांना देशभरात चांगलीच मागणी वाढली. काँग्रेस पक्षापुढे मात्र पीकेंनी काही कठोर अटी ठेवल्या होत्या, असे कळते. निवडणुकीचे डावपेच आखताना संपूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे, त्यांचीच टीम देशभर प्रत्यक्ष सर्वेक्षण करून योग्य उमेदवार निवडील; या त्यापैकी प्रमुख अटी होत्या, म्हणतात. पक्षाचे सरचिटणीस (धोरण किंवा निवडणूक रणनीती) म्हणून रीतसर नेमणूक व्हावी अशीही त्यांची मागणी होती. पक्षश्रेष्ठींशी सल्लामसलत करून त्यांची टीम पक्ष नेत्यांचे ट्वीट्स नियंत्रित करील अशीही एक अट होती. 

अर्थातच १५० वर्षांचा इतिहास असणाऱ्या पक्षाला हे सगळे स्वीकारणे जरा जडच गेले, हे उघड आहे. मात्र दोन्ही बाजूंनी कडवट शेरेबाजी होऊन बोलणी फिस्कटली नाहीत हे त्यातल्या त्यात बरे झाले. सारे काही संपलेले नाही, असे अतिसावध निवेदन पीके आणि काँग्रेस अशा दोघांकडून आले आहे. आगामी महिन्यात बोलण्यांची चौथी फेरी होऊ शकते.

... पण वेळ निघून चाललीय!काँग्रेस पक्षाच्या बाबतीत वेळ भराभर निघून चाललाय यात शंका नाही. लोकसभेच्या ३५०च्या घरातील जागांवर भाजपशी लढायचे तर काँग्रेस पक्षाला स्टिरॉईड देण्याची गरज आहे. अजिबात उशीर न करता पक्षाने आता आपले घर तातडीने सावरले पाहिजे.  पक्ष राज्यामागून राज्य गमावत चाललाय. पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आले असावे असे  एकूण चित्र आहे. सर्वत्र अस्तित्वाची लढाई चालू आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून किमान २०२४च्या निवडणुकीत तरी जाहीर करता येणार नाही हे सोनियांना कळून चुकले आहे. आता पीके प्रकरणावर पडदा पडला असेल तर गांधी कुटुंबाला पुन्हा नव्याने कंबर कसावी लागेल. पुढाकार घ्यावा लागेल.  १९९९ ते २००४  या दरम्यान सोनिया गांधी यांना ते अचूक जमले होते. यूपीए-१ त्यातूनच तयार झाली. सोनिया यांनी जे तेव्हा केले ते काँग्रेस पक्षातील ‘एम्पॉवर्ड ॲक्शन ग्रुप’ला  २०२४ साली राहुल गांधी यांच्यासाठी करता येईल? 

काळच याचे उत्तर देईल हे खरे!पीकेंचे भाजपशी का वाजले? २०१४ साली निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले, पण त्याचवेळी मोदी आणि प्रशांत किशोर यांचे बिनसले;  ते का? - याची एक वेगळीच कहाणी सांगितली जाते. पीके यांनी निवडणुकीदरम्यान जीव ओतून काम केले त्याबद्दल मोदी त्यांना बक्षिसी देऊ इच्छित होते. त्या निवडणुकीत अगदी दुरून कोणाची मदत झाली तरीही मोदी यांनी त्यांची आठवण ठेवली. मित्रांची आठवण ठेवून ते काहीना काही परतभेट जरुर देतात, असाच त्यांचा लौकिक आहे. संयुक्त राष्ट्रसंघातले प्रशांत किशोर यांचे काम मोदी यांनी निवडणुकांच्या दोन वर्षे आधी व २०१२ साली पाहिले होते. त्यांच्या क्षमतांवर मोदी फिदा होते. गांधीनगरला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक मजला पीके आणि त्यांच्या टीमला रणनीती आखण्यासाठी देण्यात आला होता.

मोदी यांनी त्यावेळी पक्षातल्या कोणावरही विश्वास न ठेवता स्वतंत्र मोहीम राबवली. मोदींचा मोठा विजय झाल्यावर आश्चर्यकारकरित्या पीके यांनी सरकारमध्ये सामील होण्याऐवजी पक्षात काम करण्याचा पर्याय निवडला. तुम्हाला काय काम पाहिजे ते शहा यांना भेटून ठरवून घ्या असे मोदी यांनी पीके यांना सांगितले म्हणतात. शहा त्यावेळी भाजपचे पक्षाध्यक्ष होते. शहा- पीके यांच्यात बरेच बोलणे झाले, पण ‘तुमच्यासाठी निवडणूक रणनीतीकार किंवा समन्वयक असे काही पद तयार करता येणार नाही’ असे शहा यांनी त्यांना सांगितले. संघ परिवाराच्या रचनेत ते बसणारे नाही असेही त्यांना सांगण्यात आले. असे काही स्वतंत्र पद तयार करायला पक्षातल्या इतर नेत्यांचाही विरोधच होता. मोदी त्यावेळी ल्यूटन्स दिल्लीला नवे होते. त्यांनीही आग्रह धरला नाही. सरकारमध्ये हवे ते पद मोदी यांनी देऊ केले, पण पीके यांनी नम्र नकार दिला. तेंव्हापासून पीके भाजपविरुद्ध धावाधाव करत आहेत. विश्वासार्ह चेहरा आणि चांगले मुद्दे समोर ठेवले तर २०२४ साली भाजपचा पराभव करता येऊ शकतो असे त्यांना ठामपणे वाटते. कॉंग्रेस पक्ष सैरभैर आहे आणि पीके यां ना २०१४ चा बदला घ्यायचा आहे. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाcongressकाँग्रेस