शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

हाफ चड्डीवाल्यांची संगत...

By राजा माने | Updated: March 5, 2018 00:27 IST

सर्वांनाच बुचकळ्यात टाकणे ही जाणता राजाची खासियत. त्यांच्या याच खासियतीमुळे आपल्या इंद्रलोकाचा स्टार रिपोर्टर येमके मात्र पुरता वैतागला आहे. अहो, मागच्या आठवड्यात ‘शेतक-यांना आरक्षण’ या त्यांच्या मागणीचा अर्थ लावण्यात भल्याभल्यांचा मेंदू झिजला.

सर्वांनाच बुचकळ्यात टाकणे ही जाणता राजाची खासियत. त्यांच्या याच खासियतीमुळे आपल्या इंद्रलोकाचा स्टार रिपोर्टर येमके मात्र पुरता वैतागला आहे. अहो, मागच्या आठवड्यात ‘शेतक-यांना आरक्षण’ या त्यांच्या मागणीचा अर्थ लावण्यात भल्याभल्यांचा मेंदू झिजला. राष्ट्रवादी मावळ्यांनी, मराठा समाजाने, सर्व जाती-धर्माच्या शेतक-यांनी आणि नरेंद्र-देवेंद्रभक्तांनीही त्यांच्या या मागणीचा काय अर्थ लावावा? इंद्रदेवांनी तोच अर्थ लावण्याची असाईनमेंट येमकेला दिली होती़ येमकेला काही रिपोर्ट देता आला नाही. अखेर येमकेचे महागुरू खुद्द नारद त्याच्या मदतीला धावून आले. त्यांनी ‘जाणता राजा’ स्वत: राजसिंहासनावर असताना त्यांनी शेतकºयांना आरक्षण का दिले नाही, याची माहिती इंद्र दरबाराच्या ग्रंथालयातून घ्या, एवढ्या एकाच वाक्यात रिपोर्ट दिला आणि विषय संपविला. हा विषय विसरलोही नाही तोवर मराठवाडा भूमीत उस्मानाबाद इलाख्यातील कळंब तालुक्यात रांजणी या कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांच्या गावी ‘हाफ चड्डीवाल्यांची संगत...’ हा नवा विषय छेडला. खरे तर हाफ चड्डीची फुल्ल चड्डी होऊन आता जमाना उलटला तरी जाणता राजाने परत हाफ चड्डीचा विषय का काढावा? बरं फक्त ते विषय काढूनही थांबले नाहीत तर चक्क त्यांच्या संगतीवर उतरले! या घटनेने ईशान्य भारतातील विजयी रथात आरूढ होऊन आनंदोत्सवात रंगलेले अनेक स्वयंसेवक विचलित झाले. काही क्षणातच आॅरेंज सिटीत रेशीम बागेच्या दिशेने अनेकांचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज धावू लागले. ही वार्ता इंद्रदरबाराला कळणार नाही, असे कसे होईल? अपेक्षेप्रमाणे नारदांचे फर्मान आमच्या येमकेला आलेच... ‘हे हाफ चड्डी प्रकरण काय आहे? तातडीने इंद्रदरबारी रिपोर्ट द्या!’ असा मेसेज येमकेला मिळाला आणि येमकेंंनी माहिती घ्यायला सुरुवात केली. रांजणी या गावी साखर क्षेत्रात दबदबा असलेल्या बी. बी. ठोंबरे यांच्या सोहळ्यात जाणत्या राजाने संतभूमीतील स्वयंसेवक बागडे नानांना उद्देशून ‘हाफ चड्डीवाल्यांच्या संगतीत राहूनही दुग्धव्यवसाय क्षेत्रात तुम्ही चांगले काम करता’ असे विधान केले, अशी माहिती येमकेला मिळाली. त्याने ती तशीच नारदांना फॉरवर्ड केली. थोड्याच वेळात नारदांकडून निरोप आला. रेशीमबाग आणि स्वयंसेवक परिवाराची काय प्रतिक्रिया आहे ते कळवा?येमकेने पुन्हा मराठी भूमीसह दिल्ली भूमीतही आपल्या सर्व सोर्सेसशी संपर्क साधला. नरेंद्रभाई वास्तुशास्त्रातील ईशान्य दिशेच्या महतीवर व्याख्यान देण्यात व्यस्त असल्याचे समजले. अमितभार्इंना संपर्क साधला तर तेही गनिमी मार्गाने रेशीमबागेत ‘ईशान्य नजराणा’ पेश करण्यात मश्गुल होते़ येमकेला आता काय करावे हेच सुचेना. म्हणून त्याने करवीरनगरी गाठली अन् थेट चंद्रकांतदादांच्या पुढ्यात जाऊन उभा राहिला. दादा म्हणाले, ‘बोला... बोला... येमकेभाऊ!’येमके दादांना म्हणाला, ‘हाफ चड्डी प्रकरण तुम्हाला तर माहीत आहे. दिल्लीदरबारी कुणीच सापडेना. तुम्हीच सांगा आता मी काय करू?’ प्रश्न ऐकून दादा गालातल्या गालात हसले. हातातल्या मोबाईलवर बोटे फिरवली आणि येमकेला म्हणाले, ‘बोला आपला मराठी भूमीपुत्र, मुंबईकर, सुनील देवधर लाईनवर आहेत.’ येमकेने मोबाईल कानाला लावला... ‘पुलोदपासून त्यांची आमची संगत आहे़ आतार् ुईशान्य भारतालाच चड्डीवाल्यांच्या संगतीचे महत्त्व विचारायला सांगा़’ 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण