शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

या गोजिरवाण्या घरात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:03 AM

माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. आपण दोघे मिळून घरात पाळणाघर काढू.

- संदीप प्रधानआजोबा आणि नातू चिंतू एका उद्यानात कोपऱ्यात बसलेले असतात. दोघांचे चेहरे तणावपूर्ण...चिंतू : आज्जो, आपण इथं का आलोय?आजोबा : चिंतू, आपल्या घरातला प्रॉब्लेम तुला चांगलाच ठाऊक आहे. त्याच्यावर सोल्युशन काढायला.चिंतू : कुठल्या प्रॉब्लेमबद्दल बोलतोयस तू आज्जो?आजोबा : (दीर्घ सुस्कारा टाकत) चिंतू, तुझे पप्पा म्हणजे आमचे चिरंजीव आॅफिसात, त्यानंतर मित्रांसोबत क्लबमध्ये आणि उरलेल्या वेळात मोबाईलमध्ये कित्ती बिझी असतात, तुला ठाऊक आहेच.चिंतू : बरोबर आज्जो. पप्पा खूप स्ट्रेसखाली आहे.आजोबा : कसला आलाय डोंबल्याचा स्ट्रेस. त्याचं लक्षच नाही घरात. परवा त्याच्या ब्लॅक टीमध्ये मी गुपचूप एरंडेल तेलाची निम्मी बाटली उपडी केली. हा शुंभ मोबाईलमध्ये गर्क. पठ्ठ्यानं पटकन कप तोंडास लावला आणि खाली ठेवला. तुझ्याएवढा होता तेव्हा घरभर पळवायचा. दुसºया दिवशी सकाळी मला म्हणतो कसा, आज अंमळ जास्तच हलकं वाटतंय.चिंतू : आज्जो, द्या टाळी. पण, इट्स नॉट फेअर. कुणाच्या नकळत असं काही मिक्स करणं बरं नाही. शिवाय, तुमचं एरंडेल तेल का काय ओल्ड फॅशन झालंय. आता रात्री दोन घ्यायच्या, सकाळी टकाटकचा जमाना आहे.आजोबा : ते जाऊ दे. मुद्दा हा की, तुझ्या पप्पाला वेळ नाही. आईला तिचे करिअर, किटी पार्टी, शॉपिंग, सोशल लाईफ यामध्ये वेळ नाही. आता आमचं कुटुंब म्हणजे सौ. त्यांनाही या वयात स्पेस हवी आहे. त्याचं काय आहे चिंतू, आमच्या हिनं आयुष्यभर नोकरी केली. तशी तिची नोकरी होती सोसोचं. म्हणजे, पंचपक्वान्नाच्या ताटात लोणचं किंवा कोशिंबीर असते तशी. पण, तिनंही चांगली ३०-३२ वर्षे इमानेइतबारे केली नोकरी...चिंतू : आज्जो, कम टू दी पॉइंट. मला फ्रेण्ड्सबरोबर मॅच खेळायला जायचंय.आजोबा : चिंतू, मुद्यावरच येतोय. त्यामुळे घरात तुला आणि तुझ्या धाकट्या बहिणीला कुणी सांभाळायचं असा पेच निर्माण झालाय. रोज भांड्याला भांड लागतंय. आपण काहीतरी सोल्युशन काढायला हवं.चिंतू : आपण काय सोल्युशन काढणार आज्जो?आजोबा : माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. आपण दोघे मिळून घरात पाळणाघर काढू. म्हणजे, आपल्या विंगमधील सगळ्याच घरांमधील मुलांच्या सांभाळण्याचा प्रश्न चुटकीसरशी सुटेल. शिवाय, तुला आणि छकुलीला दिवसभर कंपनी राहील.चिंतू : आज्जो, ही फॅन्टास्टीक आयडिया आहे. मी आजच सर्व दोस्तांना सांगतो.(आजोबा आणि चिंतू यांची घरात पाळणाघर सुरू करण्याची कल्पना घरात जुजबी खळखळ करून स्वीकारली जाते. प्रत्येकजण आपल्याला स्पेस मिळणार, या आनंदात होता. पण, चेहºयावर दाखवत नव्हता.) घरात आठदहा मुलं जमतात. दंगा सुरू होतो. आजोबा हळूच कपाटातून ग्लास आणि बाटली काढतात. तेवढ्यात,चिंतू येतो आणि डोळे वटारतो. आजोबा तोंडावर बोट ठेवून गप्प राहण्यास खुणावतात. चिंतू, मलाही हवी ना स्पेस, असं बोलतात...

टॅग्स :Familyपरिवारrelationshipरिलेशनशिप