शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

...आता तरुण हातांमध्ये स्मार्टफोन नाही, विणकामाच्या सुया! हा ट्रेंड जागतिक पातळीवर सगळीकडेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 07:34 IST

जेन-झी ही डिजिटल पिढी स्वयंप्रेरणेतून स्क्रोलिंग सोडू पाहते आहे. पॉटरी कॅफे नेहमी भरलेले असतात. सर्वत्र विणकाम, क्रोशे क्लब्ज सुरू होत आहेत.

साधना शंकर, लेखिका, केंद्रीय राजस्व सेवेतील निवृत्त अधिकारी

माझ्याकडे घरकाम करणारी मदतनीस नातीच्या वाढदिवसाला तिच्यासाठी एक सुंदर क्रोशाचा विणलेला गुलाब घेऊन आली. तिने तो कुठून आणला असं मी विचारलं तर म्हणाली, तिची कॉलेजला जाणारी मुलगी मोकळ्या वेळात क्रोशे करते. तिला ते खूप आवडतं. तिच्या कॉलेजमध्ये काही जणींनी एकत्र येऊन एक क्रोशे ग्रुप तयार केला आहे, त्या सगळ्याच मोकळ्या वेळात अशा छोट्या-मोठ्या वस्तू विणतात. 

हे काही एखादंच उदाहरण नाही… हल्ली तुम्ही कुठल्याही इव्हेंट ॲग्रिगेटर ग्रुप्सवर गेलात तर वीकेंडला काही तासांची अशी अनेक वर्कशॉप्स दिसतात. त्यात क्रोशे, विणकाम, पॉटरी म्हणजे कुंभारकाम, ओरिगामी, पेंटिंग अशा अनेक कला शिकवणाऱ्या वर्कशॉप्सचा समावेश असतो. पूर्वी ज्या गोष्टी आणि छंद हे सहसा आज्जी किंवा त्या वयाच्या लोकांची आणि प्रौढांची मक्तेदारी होती त्या गोष्टी आणि छंद जोपासण्यात जेन-झी पिढीचे लोक आता गुंतलेले दिसतात. इन्स्टाग्रामवर अनेक रील्स अशा ग्रुप्सना प्रमोट करतात. मोकळ्या वेळात एखाद्या स्क्रीनमध्ये गुंतून राहण्यापेक्षा पूर्वी आजी-आजोबांच्या पिढीत जोपासले जाणारे छंद किंवा कला ही पिढी जोपासताना दिसते. त्या जोपासणारे ग्रुप असतात आणि ते एकत्रितपणे अशा गोष्टींमध्ये सहभाग घेतात.

हा ट्रेंड जागतिक पातळीवर सगळीकडेच आहे. पॉटरी कॅफे नेहमी भरलेले असतात. सॅटर्डे नाइट आऊट्सची जागा ‘सपर क्लब्ज’नी घेतली आहे. माहजॉंगसारखे कार्ड गेम्स खेळण्यासाठी माहजांग नाइट्स असतात आणि विणकाम, क्रोशे क्लब्ज तर सगळीकडे सुरू होत आहेत. तरुण, जेन-झी पिढीच्या लोकांची तिथे गर्दी असते. ही डिजिटल जनरेशन स्वयंप्रेरणेतून स्क्रोलिंग सोडून इतरत्र, विशेषकरून हातांनी करायच्या कामांकडे वळताना दिसत आहे. सहज सोप्य वाटणाऱ्या या कृती  एकाग्रता वाढवतात आणि मानवी संवाद दृढ करतात.

जेन-झी स्मरणरंजनाचा मार्ग म्हणून या कलाप्रकारांकडे, छंदांकडे वळत असल्याचं काही संशोधकांचं मत आहे. विणकामाच्या सुयांच्या आवाजाकडे ही पिढी एक सकारात्मक किंवा आशावादी दृष्टिकोनातून पाहत असल्याचं काहींना वाटतं, तर काहींच्या मते बदलत्या काळाच्या ताणतणावांशी ‘जुळवून घेण्या’च्या धडपडीचाच तो भाग आहे. सतत ऑनलाइन, सतत कनेक्टेड राहण्यातून, त्यातून होणाऱ्या दमणुकीतून ब्रेक घेण्याचा एक मार्ग म्हणून ही पिढी या छंदांकडे पाहते. काही तज्ज्ञ याला कोविडच्या महामारीनंतर स्वतःला सर्जनशीलतेकडे वळवण्याचा या पिढीचा एक मार्ग म्हणूनही पाहतात. 

कला आणि त्यातही हे जुने कलाप्रकार शरीर आणि मनाला हवाहवासा असलेला एक ‘रिसेट’ देतात. विणकामातली सलग गंमत, कुंभारकामाच्या चाकावर तयार होणाऱ्या वस्तूंना हातांच्या विशिष्ट हालचालींतून आकार देताना होणाऱ्या हालचालींमुळे शरीर काहीसं निवांत होतं. स्वतःवर नियंत्रण ठेवतं. त्यातून निर्माण होणारी शांतता मनापर्यंतही पोहोचते. अशा गोष्टी मन शांत करतात आणि मज्जासंस्थेला विश्रांती देतात. त्यात होणारा हातांचा वापर हळुवार असतो. आजीच्या काळातल्या छंद आणि कलांमध्ये स्वतःला गुंतवून घेते म्हणून जेन-झी ऑनलाइन जगापासून दूर जाते आहे, असं अजिबात नाही. माझ्याकडे घरकामाला येणाऱ्या मदतनीस महिलेच्या मुलीने आणि तिच्या क्रोशे ग्रुपने त्यांनी केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी ऑनलाइन विक्रीचा मार्ग निवडला आहे. इतर ग्रुप्सशी जोडून घेण्यासाठीही त्या ऑनलाइन पर्याय वापरतात.

डिजिटल पर्यायांच्या अतिरेकी वापरामुळे मानसिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची चिंता असली, तरी स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक समतोल साधण्याची धडपड ही पिढी करते आहे. त्यासाठी निर्बुद्धपणे स्क्रोलिंग करण्यापासून स्वतःला रोखत ते आजीच्या काळातले छंद आपलेसे करताना दिसतात. त्यानिमित्ताने लोकांना प्रत्यक्ष भेटून संवादाचा अनुभवही घेतात. हा नवीन ट्रेंड जगण्याचा एक भाग होईल की नवे काही आकर्षक पर्याय आल्यानंतर तो नाहीसा होईल, हे येणारा काळच सांगेल. पण डिजिटल पूर्व काळातील काही आनंद पुन्हा नव्याने शोधणं हे पाऊल योग्य दिशेला जाणारं आहे, एवढं नक्की.    sadhna99@hotmail.com

English
हिंदी सारांश
Web Title : Youth embrace knitting needles, not smartphones: A global trend.

Web Summary : Gen-Z rediscovers traditional hobbies like knitting and pottery as a break from digital overload. These activities offer stress relief, mindfulness, and social connection, blending old crafts with modern online platforms.