शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

संपादकीय - या टग्यांना कोण आवरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 08:26 IST

गायकवाडविरुद्ध गायकवाड या वैमनस्याला जमिनीच्या वादाची किनार आहेच; पण त्यामागे राजकीय दुश्मनीही  आहे.

भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर पोलिस ठाण्यातच केलेला गोळीबार राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे दाहक उदाहरण आहे. आ. गायकवाड धाडधाड गोळ्या चालवत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेच. निर्ढावलेपणाचा कळस म्हणजे आमदार महाशयांनी या गोळीबाराचे समर्थन केले आहे. स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा दावा त्यांनी केला असला तरी तशी परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवली होती हे प्रथमदर्शनी तरी दिसत नाही. हे आमदार भाजपचे आणि ज्यांना गोळ्या झाडल्या ते महेश गायकवाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे. कायदा व सुव्यवस्था स्थिती राखण्याची जबाबदारी सरकारची असते आणि आमदार या नात्याने त्या सरकारचा भाग असलेला एक नेता थेट पोलिस ठाण्यात गोळ्या चालवतो याला राजकारणातील माफियागिरी नाही म्हणायची तर काय म्हणायचे?

गायकवाडविरुद्ध गायकवाड या वैमनस्याला जमिनीच्या वादाची किनार आहेच; पण त्यामागे राजकीय दुश्मनीही  आहे. कल्याणच्या सुभेदारीवरून घडलेला हा संघर्ष आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी भूमाफियांचे पेव फुटले आहे. वाढते शहरीकरण, त्यातून जमिनींना आलेला सोन्याचा भाव आणि त्यातून भूमाफियांचा झालेला सुळसुळाट हा सार्वत्रिक चिंतेचा विषय! कायदा हातात घेतला तरी आपले काहीही बिघडत नाही ही बेदरकारवृत्ती वाढीला लागली असून, तिला वेळीच वेसण घालण्याची आवश्यकता आहे आणि ही जबाबदारी राज्य सरकारची व गृहखात्याची आहे. ड्रग माफियांचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची भूमिका घेत अलीकडे गृहखात्याने अनेक ठिकाणी मोठ्या कारवाया केल्या. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधातही तशीच ठाम भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. त्यात सरकारमधील लोकांना अनेक ठिकाणी ‘आपल्या’ माणसांचा बंदोबस्त करावा लागेल. सामान्य माणसांना भयमुक्त आणि कायद्याने चालणारे रामराज्य द्यायचे असेल तर असा बंदोबस्त केल्याशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्राची ओळख एक पुरोगामी, सुसंस्कृत आणि सभ्य राज्य अशी आहे. ती ओळख पुसू पाहणारे असभ्य, उर्मट, उन्मादी लोक कितीही मोठे असले तरी त्यांना वेसण घालणे गरजेचे झाले आहे. प्रश्न सरकारच्या मानसिकतेचा आहे. ‘आपला’ माणूस म्हणून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना अभय दिले जाणार असेल तर सर्वच क्षेत्रांत माफियागिरी हातपाय पसरेल आणि एकदिवस सुसंस्कृत महाराष्ट्राला अशा अपप्रवृत्तींचा विळखा पडेल. त्यावेळी सगळे काही हाताबाहेर गेलेले असेल.

आधी राजकारणात या ना त्या मार्गाने प्राबल्य मिळवायचे, मग सत्तेतून पैसा आणि पैश्यांतून पुन्हा सत्ता हस्तगत करण्यासाठी वाट्टेल ते मार्ग अवलंबायचे हा बऱ्याच राजकारण्यांचा धंदा झाला आहे. सारेच तसे आहेत असे मुळीच नाही; पण टगेगिरी, भाईगिरीचे वाढते विश्व हे राज्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे. त्यामुळेच कोणताही आपपरभाव न ठेवता गुंडांच्या नांग्या ठेचणे गरजेचे झाले आहे.  गोळीबाराच्या निमित्ताने भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत मिठाचा मोठा खडा पडला आहे. आ. गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने दोन पक्षांमधील विशेषत: ठाणे- कल्याण- पालघर पट्ट्यातील दुरावा वाढू शकतो. या गोळीबाराच्या घटनेला दोन दिवस उलटून गेले तरी आ. गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाईदेखील भाजपने केलेली नाही. उलट गायकवाड यांनी त्यांच्या जीवावर बेतले म्हणून गोळीबार केल्याचे दिसते, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हणणे हे अतार्किक आहे आणि त्यातून गायकवाड यांना पाठीशी घालण्याचा हेतू डोकावतो. हे असे (म्हणजे गोळीबार वगैरे) काही करण्याचा आपला संस्कार नाही, पक्षाची त्यातून बदनामी होते अशी पुस्ती बावनकुळे एकीकडे जोडतात; पण पक्ष म्हणून त्यांच्याच नेतृत्वातील भाजप गायकवाड यांच्यावर कारवाई करत नाही ही भूमिका परस्परविरोधी आहे.

गणपत गायकवाड आणि त्यांनी ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या ते महेश गायकवाड यांनी आपसातील वाद वाढवू नये, असा आदेशवजा सल्ला दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना दिलेला होता; पण त्याचा काहीएक परिणाम झाला नाही आणि वादाचे पर्यवसान गोळीबारात झाले. जिल्ह्याजिल्ह्यातील महायुतीची घरातली भांडणे सोडविण्यात शीर्षस्थ नेतृत्वाला आलेले अपयशदेखील यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.

टॅग्स :Firingगोळीबारulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारी