शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

इफ्फी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची फडकती पताका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 16:45 IST

चित्रपट हे मनोरंजनाबरेबरच निखळ अभिव्यक्तीचे माध्यम मानले जाते. उच्चार स्वातंत्र्याचे सक्षम व प्रभावी अस्त्र म्हणून त्याकडे पाहिले जाते. गोव्यात सुरू असलेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) त्याचा प्रत्यय वारंवार येतो.

राजू नायकपणजी - चित्रपट हे मनोरंजनाबरेबरच निखळ अभिव्यक्तीचे माध्यम मानले जाते. उच्चार स्वातंत्र्याचे सक्षम व प्रभावी अस्त्र म्हणून त्याकडे पाहिले जाते. गोव्यात सुरू असलेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) त्याचा प्रत्यय वारंवार येतो. इस्रायल देशाच्या प्रवेशिका असलेल्या ‘रेड काव’ तसेच सिरियाची पेशकश असलेल्या‘ रेन आॅफ हॉम्स’ या चित्रपटांनी तर यंदाच्या महोत्सवाला उच्च स्तर प्रदान करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पताका फडकत ठेवलेली दिसते. दोन्ही चित्रपटातून धार्मिक कट्टरवादाविरुद प्रखर भाष्य केलेले दिसते.

‘रेड काव’ या चित्रपटात एका सोळा वर्षीय मुलीला येणारे भवतालाच्या धार्मिक व राजकीय आयामाचे भान आणि स्वत:च्या लैंगिकतेची जाणीव याचे चित्रण आहे. ही मुलगी आणि तिचे कट्टरपंथी वडील यांच्यातला संघर्ष चित्रपटात मनोज्ञपणे रेखाटलाय. धर्मप्रचारक असलेले वडील नेहमीच विद्वेशाची आणि रक्तपताची भाषा बोललतात. मुलगी या अतिरेकाचा प्रतिकार तर करतेच पण या विचारंपासून पृथक होत स्वत:च्या स्वातंत्र्याची वाट शोधू लागते. तिचा विद्रोह आणि त्याचबरोबर तिचे समलिंगी संबंधात गुंतणे हे ज्या प्रभावीपणाने दाखवलेले आहे त्यातून खुद्द इस्रायलमध्येही बराच काळ खळबळ माजली होती. दिग्दर्शक त्सिविया बरकाई यानी चित्रपट प्रदर्शनावेळी सांगितले की इस्रायलमध्ये चित्रपटाचे खुलेआम चित्रीकरण करणे शक्यच नव्हते. गुप्तता पाळून बंद दरवाजांआड शुटींग करण्यात आले. बाह्य चित्रीकरणही कुणाच्या सहजासहजी लक्षात येऊ नये याची दक्षता बाळगून करण्यात आले. आभिव्यक्तीस्वातंत्र्यावर आपल्या देशात असलेल्या निर्बंधांकडेच त्यानी अशा प्रकारे अंगुलीनिर्देश केला. इस्रायलने पॅलेस्टाईनवर केलेले अनन्वित अत्याचार व रक्तपात यांच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट जे कठोर भाष्य करतो त्यातून निर्माता- निर्देशकाबद्दलचा आदर द्विगुणीत होतो.

सिरियावरील‘ रेन आॅफ हॉम्स’ या चित्रपटातून इस्लामी दहशतवादाचा घेतलेला समाचार वाखाणण्याजोगा आहे. तेथील ख्रिश्चन अल्पसंख्यांकावर होत असलेल्या अत्याचारांचे चित्रण प्रभावीपणे करण्यात आले आहे. हिंसाचारात उध्वस्त झालेली शहरे, परांगदा झालेले लोक आणि कधीही काहीही होऊ शकते ही विदारक जाणीव सोबत घेऊन आला दिवस कसाबसा ढकलणारे अल्पसंख्यांक याचे थरकाप उडवणारे दर्शन चित्रपटातून घडते. बराच वेळ दर्शकाना अस्वस्थ ठेवण्याचे श्रेय चित्रपटाला जाते.

कान्स सारख्या महोत्सवात असाच प्रकारचे विषय हाताळणारे आणि त्याच बरोबर उच्चारस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे चित्रपट दाखवले जातात. त्यामुळेच हा महोत्सव वादग्रस्तता तर मिरवतोच, पण आपले असाधारण स्थानही राखतो. त्या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा विचार करतो तेव्हा व्यवस्थेतून प्रसवलेल्या विशिष्ट विचारसणीच्या पगड्याखाली हा महोत्सव अधिकाधिक गतीने जात असल्याचे दिसते. गेल्या काही वर्षांत विशिष्ट चित्रपटाना प्रदर्शित होण्यापासून डावलण्यात आले. यावेळीही नंदिता दास यांच्या ‘मंटो’ या चित्रपटास संधी नाकारली गेली. या बाबी महोत्सवाचे महत्त्व झाकोळून टाकताना उच्चारस्वातंत्र्याची मुस्कटदाबीही अधोरेखीत करतात. आपल्या देशात वाढत चाललेला धार्मित कट्टरवाद अशा माध्यमातून पुढे आणलेला दिसत नाही. सनातनी प्रवृत्तीनी देशभर घातलेला हैदोस चढत्या भाजणीने वाढत असताना त्याच्या विरोधाचे पडबींब साहित्य वा कलेच्या माध्यमातून पडताना दिसत नाही; साहित्यिक वा कलाकार या कूप्रवृत्तीला भिडलेले दिसत नाहीत. अन्य देशातून वास्तवाचे चित्र प्रखरपणे मांडत उच्चारस्वातंत्र्याची पताका फडकत ठेवण्याच्या जिद्दीच्या पार्श्वभूमीवर आपल्या आसपासचे नेभळटपणाचे सत्य मनाला बोचत राहाते.

टॅग्स :IFFIइफ्फीgoaगोवा