शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL 2026 Playoff Race : स्क्रिप्ट भारी की, मॅच? १६ गुण कमावणाऱ्यांसाठीही पोटात गोळा आणणारा ट्विस्ट
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
7
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
8
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
9
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
11
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
12
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
13
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
14
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
15
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
16
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
17
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
18
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
19
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
20
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून आयपीएलला सुरुवात; घरात कैद झालेल्यांसाठी समाधानाची झुळूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 06:54 IST

आजपासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे घरात कैद झालेल्यांकरिता हीच काय ती समाधानाची झुळूक ठरणार आहे.

कोरोना संघ मैदान सोडायला तयार नाही. त्याच्याशी आपल्याला आणखी किती षटके मुकाबला करावा लागणार, तेही माहीत नाही. कुठल्याही सामन्यात सुरुवातीला जलदगती गोलंदाजांच्या तुफान वेगवान गोलंदाजीचा अनुभव फलंदाजाला घ्यावा लागतो तसा गतवर्षी कोरोनाने आपला ‘पेस’ दाखवला. त्यानंतर कोरोनाचा वेग मंदावला. क्रिकेटच्या मैदानावर स्पीनर्स उतरल्यावर खेळाचा वेग मंदावतो तसेच काहीसे झाले. मात्र स्पीनर्सचा एखादाच चेंडू अलगद यष्टी उडवून जातो; तसेच आपले झाले. कोरोना संपला या भ्रमात आपण स्पीनरला फ्रंटफूट येऊन खेळायला गेलो आणि चेंडू दांडी उडवून गेला.  आता कोरोनाने पुन्हा पेसचे अस्त्र परजले असून, गुणाकाराच्या संख्येत रुग्ण वाढत आहेत. साहजिकच मृत्युदर वाढत आहे. अर्थात याबरोबर हॉस्पिटलमध्ये बेड न मिळणे, रेमडेसिव्हिरसारखी इंजेक्शन न मिळणे, वैद्यकीय कर्मचारीवर्ग अपुरा पडणे आदी असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रोजगार, उत्पन्न वगैरे बाबींवर वरवंटा फिरणार आहे तो वेगळाच!



अशा परिस्थितीत आजपासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे घरात कैद झालेल्यांकरिता हीच काय ती समाधानाची झुळूक ठरणार आहे. आयपीएलच्या वेगवेगळ्या संघातील क्रिकेटपटू हेही कोरोनाचा सामना करीत आहेत. आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल याने कोरोनावर मात केली असतानाच त्याच संघाचा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू डॅनियल सॅम याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुंबई इंडियन्सचे सल्लागार किरण मोरे हेही कोरोनाग्रस्त झाले. गतवर्षी कोरोनाचे सावट असल्याने आयपीएल अबुधाबी येथे आयोजित केल्या होत्या. यंदा आयपीएल भारतात होत असून, सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतही सामने होणार आहेत. अर्थात स्टेडियममध्ये जाऊन क्रिकेटप्रेमींना हे सामने पाहता येणार नाहीत.



मुळात आयपीएलचे जे इकॉनॉमिक मॉडेल आहे त्यामध्ये अन्य क्रिकेट सामन्यांसारखे दर्शकांनी तिकिटे खरेदी करून मैदान गाठल्यावर नफा होईल, असे नाही. आयपीएल सामन्यांचे घरोघरी थेट प्रक्षेपण करण्याचे राइट‌्स दोन ते अडीच हजार कोटी रुपयांना क्रीडावाहिनी खरेदी करते. त्यामुळे जेवढे प्रेक्षक टीव्हीवर हे सामने पाहतील तेवढा उदंड प्रेक्षकवर्ग वाहिनीला लाभतो. टीआरपीचे हे गणित वाहिनीला जाहिरातीचे उत्पन्न मिळवून देेते. ज्या सामन्यांना जास्त टीआरपी त्याच्यानुसार टीमला वाहिनीकडून नफ्यातील हिस्सा मिळतो. आयपीएलमध्ये सहभागी क्रिकेटपटूंच्या निवासापासून अनेक खर्चाची जबाबदारी टीमचे मालक उचलत नाहीत, तर बीसीसीआय उचलते.



आयपीएलवरील सट्टाबाजार हा गेल्या काही वर्षांत शेअरबाजाराइतपत स्थिरावला आहे. मैदानात प्रत्यक्ष पडणारा चेंडू आणि टीव्हीवर मैदानात पडताना दिसणारा चेंडू यात असलेले अर्धा-पाऊण मिनिटांचे अंतर शेकडो कोटी रुपयांच्या उलथापालथी घडवते. ॲमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘इन्साइड एज’ या वेेब सिरीजमध्ये आयपीएल सामने व त्यानिमित्ताने होणारे बेटिंग, मँच फिक्सिंग व तत्सम अनेक बऱ्यावाईट बाबींवर प्रकाश टाकला आहे. अर्थात प्रत्येक गोष्टीला दोन्ही बाजू असतात. आयपीएलच्या निमित्ताने होणारी आर्थिक उलाढाल ही सध्याच्या आर्थिक परिस्थितीत क्रिकेटपटू, फिजिओथेरपिस्ट, मैदानावरील कर्मचारी वर्ग अशा अनेकांना  दिलासा देणारी आहे. कोरोना संकटाच्या काळात हे आयोजन शिवधनुष्य उचलण्यासारखे आहे. अर्थात कोरोनासंबंधीचे नियम आयपीएलच्या मैदानावर, हॉटेलात कसोशीने पाळले जातात.

कोरोनाने बॉलिवुडपासून मराठी नाट्य व्यवसायापर्यंत, शिक्षणापासून मीडियापर्यंत, कामगारांपासून उद्योजकांपर्यंत अनेकांना फटका दिला असताना देशातील नव्हे तर विदेशातील नामांकित क्रिकेटपटू जिवाची जोखीम पत्करून भारतात येऊन खेळण्याचे एकमेव कारण म्हणजे अर्थातच त्यांना मिळणारा बख्ख‌ळ पैसा! कोरोना काळातली पोटाची भ्रांत हजारो मजुरांना हजारो किलोमीटरची पायपीट करून बिहार, झारखंडमधील आपले गाव गाठायला जसे भाग पाडते तसेच विदेशी क्रिकेटपटूंनाही भारतात व मुख्यत्वे मुंबईत कोरोनाचा प्रकोप सुरू असताना पुढील किमान दीड महिना मुक्काम करायला भाग पाडणार आहे. 

गतवर्षीचे विजेते मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटपटूंचे नृत्य असलेले  ‘एक नारळ दिलाय दर्या देवाला’ हे कोळीगीत सध्या गाजत आहे. क्रिकेटच्या 
मैदानावर खरा देव ‘दर्शक’. तो यंदा घरीच बसलेला आहे. किंबहुना दर्शक देवाला घरी बसण्याचा ‘नारळ’ दिल्याने आयपीएल आर्थिकदृष्ट्या 
यशस्वी होणार आहे.

टॅग्स :IPLआयपीएल २०२१corona virusकोरोना वायरस बातम्या