गावोगावच्या जत्रा-यात्रा, ऊरुस, कुस्त्यांचे फड, तमाशांचे रंग, परीक्षा संपताच उन्हाळी सुट्ट्यांची धूम, लग्नसराईचा माहोल, आंब्याचा हंगाम आणि कडक उन्हाळा, असे सर्व मार्च ते जूनचे चार महिने जाणार होते. देश-विदेशांतील पर्यटनाचा बहार येणार होता. मनुष्यप्राण्यांच्या या सर्व उत्सवावर कोरोनाचे सावट आले अन् जीवनच निरर्थक वाटू लागले. भीतीचा गोळा प्रत्येकाच्या पोटात आला. प्रशासन हादरले. शासन नावाची यंत्रणा सर्व कामे रद्द करून या सावटाचा परिणाम मनुष्यप्राण्यांवर होऊ नये, यासाठी रात्रीचा दिवस करू लागली आहे. या सावटाची गर्दता अजून संपलेली नाही. किंबहुना दिवाळीचा आनंदसुद्धा लुटता येईल की नाही, अशी शंका आहे.मान्सूनचा पाऊस सुरू होतो. भारतीय कृषी संस्कृतीच्या नव्या अध्यायाने धरणीमाता हिरवीगार शालू नेसून नवा अंकुर फुलविण्यासाठी तयारी करत असते. सरीवर सरी पडणाऱ्या पावसाच्या थेंबाने माणसांची कडक उन्हाळ्यापासून सुटका होते. बैलपोळा साजरा झाला की, नद्यांना येणाऱ्या नव्या पाण्याच्या यात्रा सुरू होतात. अंबील जत्रांनी गावे नटून जातात. अशा एकामागून एक सणांची गर्दीच होऊन जाते. ‘श्रावणमासी, हर्ष मानसी’ गुणगुणावे असे वातावरण बनते. श्रावणात अनेक डोंगरमाथ्यांवर वस्ती करून असलेल्या देव-देविकांच्या यात्रांचा उत्सव रंगत असतो. भारतीय मनुष्याच्या मनात उत्सवांची मोठी भाऊगर्दी असते. तेवढ्यात गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू होते. अकरा दिवसांच्या या गणेशोत्सवाने संपूर्ण महाराष्ट्र न्हाऊन निघतो. कोरोनाने या जीवनपद्धतीचा बेरंग करून सोडला आहे. माणसाने समूहाने राहणे आणि आनंदी जगणे यावरच मर्यादा आल्या आहेत. परिणामी, हजारो-लाखोंच्या संख्येने लोकांना एकत्र आणणारा लोकोत्सव कसा साजरा करता येईल, याची चिंता पडणे साहजिकच आहे.
कोरोना संकटामुळे लोकोत्सवही ‘लॉकडाऊन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 05:37 IST
भारतीय संस्कृती ही उत्सव साजरा करण्यासाठी जेवढी समृद्ध आहे, तेवढीच ती समाज आणि माणसांची काळजी घेण्यासाठीही प्रबळ इच्छाशक्ती व्यक्त करणारी आहे. माणसांनी एकत्रच येण्यावर मर्यादा आल्याने त्यांचे व्यवहार मंद झाले आहेत.
कोरोना संकटामुळे लोकोत्सवही ‘लॉकडाऊन’
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}