शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
4
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
5
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
6
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
7
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
8
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
9
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
10
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
11
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
12
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
13
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
14
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
15
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
16
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
17
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
19
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
20
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
Daily Top 2Weekly Top 5

‘संवेदना’च नाहीशी होणार असेल तर ‘जिवंत माणसाचं काम काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 08:08 IST

मी काही जाणकार लोकांना विचारलं ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स- ही कृत्रिम बुद्धिमत्ता नावाची काय गोष्ट आहे?

मी काही जाणकार लोकांना विचारलं ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स- ही कृत्रिम बुद्धिमत्ता नावाची काय गोष्ट आहे?’ त्या त्या क्षेत्रातल्या काही  लोकांनी मला जे सांगितले,  त्याचे सार मग मी माझ्या अल्प मतीप्रमाणे काढण्याचा प्रयत्न केला. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय?- आजपर्यंत सजीव माणूस आपलं डोकं चालवून जे काही नवं जुनं असेल ते ठरवत होता. मी लेखक असेन तर माझं लेखन जे काही बरं वाईट असेल ते माझं मी करीत असे.  आता  माणसाच्या कर्तृत्वशक्तीची बंधने संपणार आणि आर्टिफिशियल इंटिलिजन्स नावाची गोष्ट  तुमच्या बुद्धिच्यापेक्षा जास्त क्षमतेने काम करणार... त्यामुळे ती तुमच्या बुद्धिमत्तेच्या पलीकडे जाणार. आर्टिफिशियल इंटिलिजन्सपुढे माणूस तोकडा पडणार.  म्हणजे मला स्थानच नाही काही.

मी एक लेखक असेन, मी काही बरा वाईट अनुभव घेऊन समजा एखादी कथा लिहिली तर आर्टिफिशियल इंटिलिजन्स त्याच्याहीपेक्षा मोठ्या गोष्टी आपोआप लिहू शकेल म्हणतात. म्हणजे तारा भवाळकर यांनी केले त्याला काहीच अर्थ नाहीये, मोडीत गेली ती!  मग माणसाच्या अस्तित्वाला किंमत राहणार की नाही? माणसाच्या हरेक कृतीमागे त्याचा अभ्यास, विचार आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याची संवेदना असते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जर ती संवेदनाच नाहीशी होणार असेल तर मग जिवंत माणसाचं काम काय?