शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: मॉरिशस कोरोनामुक्त; पण नागरी स्वातंत्र्य संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 00:56 IST

मॉरिशसच्या दवाखान्यांत दाखल असलेल्या सर्व कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला असून, एकही रुग्ण दवाखान्यांत दाखल नाही व संपूर्ण देशात आजच्या घडीला एकही कोरोना रुग्णाची नोंद नसून, गेल्या १७ दिवसांत एकही नवीन रुग्ण दाखल झालेला नाही.

मॉरिशस - मॉरिशस. हिंदी महासागरातलं एक नितांत सुंदर बेट. मॉरिशसच्या आरोग्यमंत्र्यांनी बुधवारीच जाहीर केलं की, मॉरिशसच्या दवाखान्यांत दाखल असलेल्या सर्व कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला असून, एकही रुग्ण दवाखान्यांत दाखल नाही व संपूर्ण देशात आजच्या घडीला एकही कोरोना रुग्णाची नोंद नसून, गेल्या १७ दिवसांत एकही नवीन रुग्ण दाखल झालेला नाही. कोरोनावर मॉरिशसने जवळजवळ मात केली असून, विजय मिळविला आहे, असं आरोग्यमंत्र्यांनी एएफपी वृत्तवाहिनीला सांगितले आणि हेही स्पष्ट केलं की, एकही रुग्णाची नोंद नाही म्हणजे कोरोना गेला असं समजण्याची चूक आम्ही करणार नसून, टेस्टिंग चालूच ठेवणार आहोत, अजून हे युद्ध कायमचं संपलेलं नाही.ही आनंदवार्ता आहेच की, निदान एका देशाला कोरोनावर मात करणं जमलं. मॉरिशसमध्ये जगभरातून लोक येतात आणि त्यामुळे अधिक सावधगिरी बाळगत मॉरिशसनं कडक लॉकडाऊन केलं होतं. या देशात ३३२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आणि त्यापैकी १० रुग्ण दगावले, बाकी ३२२ रुग्णांना घरी सोडले आहे; मात्र तरीही मॉरिशसमध्ये लॉकडाऊन कायम राहणार आहे. १५ मेपासून काही दुकानांना काम सुरू करण्याची परवानगी मिळणार आहे. त्यात बेकरी, मासेमारी, खाटीकखाने हे यांचा समावेश आहे. अन्य व्यवसाय, बार, बाजारपेठा मात्र बंदच राहणार आहेत.एक आॅगस्टला शाळा सुरूहोतील, असं आधीच जाहीर करण्यात आलंआहे. मॉरिशसचे सुंदर समुद्रकिनारेही नागरिकांसाठी खुले नाहीत. हे सारं एकीकडे कडक अंमलबजावणीसह सुरू असलं व त्याचे उत्तम फायदे सरकारला मिळत असले, तरी त्यातून नागरिकांचं स्वातंत्र्य आणि कामगारांचे प्रश्न या विषयावरून मात्र मॉरिशसमध्ये सामाजिक भूकंप होऊ शकतो. त्याचं कारण ठरताहेत सरकारने आणलेली दोन विधेयके. कोविड बिल आणि क्वारंटाईन बिल. या विधेयकांना कामगार संघटनांसह अनेक नागरी संस्थाही प्रखर विरोध करीत आहेत; मात्र सरकार माघार घ्यायला तयार नाही. सरकारचं म्हणणं आहे की, कोरोनावर मात करायची आणि अर्थव्यवस्थाही टिकवायची तर हे दोन्ही विधेयके कायद्यात बदललेच पाहिजे.या दोन विधेयकांमध्ये अनुक्रमे दोन गोष्टींना स्थानिक लोकांचा सक्त विरोध आहे. एक म्हणजे क्वारंटाईन विधेयक पोलिसांना अधिकार देतात की, ते कधीही विनावॉरंट कुणाच्याही घरात घुसून झडती घेऊ शकतात आणि लोकांना क्वारंटाईन करूशकतात.दुसरं म्हणजे कोविड विधेयकानुसार मालक महिन्याचा पगार हातावर टेकवून कर्मचाऱ्याला ‘तू कामावर येऊ नकोस,’ असं सांगू शकतात. पगार देण्याइतपत तयारी नसेल तर अल्पसूचना देऊनही कामगारांना काढून टाकलं जाऊ शकतं. याच दोन गोष्टींना स्थानिकांचा विरोध आहे. लोकांचं म्हणणं आहे की, कोरोना काळात आम्ही सरकारला साथ दिली. मात्र, जाचक नियम कोरोनाच्या नावाखाली लादले जाऊ नयेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीय