शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चैतन्य

By admin | Updated: October 8, 2015 04:41 IST

त्या दिवशी छोट्या हेलनचा मूड काही औरच होता़ तिने नव्या बाहुलीचे केस उपटले़ हात-पाय तोडून इकडे तिकडे फेकले. कपडेही फाडले. अशावेळी एक मध्यवयीन स्त्री प्रवेश करून

- रमेश सप्रे

त्या दिवशी छोट्या हेलनचा मूड काही औरच होता़ तिने नव्या बाहुलीचे केस उपटले़ हात-पाय तोडून इकडे तिकडे फेकले. कपडेही फाडले. अशावेळी एक मध्यवयीन स्त्री प्रवेश करून हेलनच्या आईवडिलांना म्हणते, ‘मी शिक्षिका म्हणून आले आहे’. त्यांनी तिला विचारलं, ‘आधीच्या शिक्षकांची काय हालत झाली याची कल्पना आहे ना’? यावर तिचं उत्तर, ‘हो, जाहिरात नीट वाचूनच मी आलेय़ कुठंय माझी विद्यार्थिनी’? बाबा म्हणाले, ‘आता तिच्याजवळ जाणं धोक्याचं आहे’ पण ती आत गेली़ पाहते तो काय! हेलन रागानं बाहुलीचा आणखी सत्यानाश करत होती़ शिक्षिकेनं तिचा हात धरून तिला मागच्या बागेत नेलं़ विहिरीवरील पंपानं तिच्या एका हातावर पाणी सोडलं़ दुसऱ्या हातावर लिहिलं, ‘डब्ल्यू ए टी इ आर’, नंतर तिच्या छोट्याशा हातावर एक दगड ठेवला व दुसऱ्या हातावर बोटानं लिहिलं, ‘एस् टी ओ एन इ’ नंतर गुलाबाचं फूल घेऊन हेलनच्या गालाला पाकळ्यांनी कुरवाळलं, नाकासमोर गुलाब धरून वास दिला़ असं निरनिराळ्या वस्तूंबरोबर केल्यावर हेलनच्या मनात एक विचार घट्ट बसला़, प्रत्येक वस्तूला नाव आहे़ मी जिवंत आहे म्हणून प्रत्येक गोष्ट जिवंत आहे़ या विचारासरशी आपला हात शिक्षिकेच्या हातातून सोडवून घेत हेलन धावतच आपल्या खोलीत आली़ पडलेले सर्व बाहुलीचे तुकडे गोळा करून छातीशी धरून ओक्साबोक्शी रडू लागली़ शिक्षिका तिच्याजवळ जाऊन तिच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवू लागली़ त्या स्पर्शातील जिव्हाळा हेलनला जाणवत होता़ आयुष्यातला सर्वात पहिला व अत्यंत महत्त्वाचा पाठ तिनं शिकला होता़ हा आंधळ्या-मुक्या-बहिऱ्या हेलन केलरचा शिक्षणाचा श्रीगणेशा होता़ स्पर्श-गंध-रूची यांच्या माध्यमातून आपली कल्पनाशक्ती वापरून तिनं ज्ञान मिळवायला आरंभ केला़ एका महान गुरूशिष्याच्या जोडीनं म्हणजेच अ‍ॅन सलिव्हन आणि हेलन केलर यांनी घडवलेला शिक्षण क्षेत्रातला तो महान चमत्कार ठरला़ ज्ञानोबा माऊलीनं वर्णिलेल्या जीवनसत्याचा तो साक्षात्कार होता़ या उपाधिमाजी गुप्त। चैतन्य असे सर्वगतपरि ते तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती सर्व वस्तूत जिवंतपणा आहे़, सर्व गोष्टींना भावना आहेत़, असं मानून त्याप्रमाणे सदासर्वदा सर्वांशी प्रेमानं वागलं तरी खूप आहे़ तत्त्वज्ञासारखी बुध्दीच हवी असं नाही़ फ क्त मन हवं संवेदनशील, आत्मियतेनं ओतप्रोत भरलेलं़ बस् !