शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

गोबेल्सची इंद्रदेवांकडे कैफियत

By राजा माने | Published: April 16, 2018 12:10 AM

महागुरू नारदांसोबत इंद्र दरबारात उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याने आपला इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमके आज खुशीत होता. कुठलीही असाईनमेंट नाही, टेन्शन नाही म्हणून खुशीतच त्याने नारदांच्या कक्षात प्रवेश केला. कुठचाही विषय नसताना इंद्र दरबारात मराठी भूमीच्या प्रतिनिधीला का बोलावले जातेय, ही शंकेची पाल मात्र त्याच्या मनात चुकचुकत होती.

महागुरू नारदांसोबत इंद्र दरबारात उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याने आपला इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमके आज खुशीत होता. कुठलीही असाईनमेंट नाही, टेन्शन नाही म्हणून खुशीतच त्याने नारदांच्या कक्षात प्रवेश केला. कुठचाही विषय नसताना इंद्र दरबारात मराठी भूमीच्या प्रतिनिधीला का बोलावले जातेय, ही शंकेची पाल मात्र त्याच्या मनात चुकचुकत होती. ती शंका हद्दपार व्हावी म्हणून त्याने महागुरूंना छेडले...यमके : गुरुदेव, आजच्या दरबाराचा अजेंडा काय आहे?नारद : (स्मितहास्य करत) गोबेल्स...यमके : म्हणजे...?नारद : जोसेफ गोबेल्स तुला माहीत नाही का? अरे, जगाची झोप उडविणाऱ्या हिटलरचा तो उजवा हात होता.यमके : हो, मला माहिती आहे... ८०-९० वर्षांपूर्वी या माणसाने जनसंपर्क आणि माहितीशास्त्रात आपल्या अफलातून नीतीने खळबळ उडवून देऊन इतिहास घडविला होता.नारद : अगदी बरोबर ! तेव्हापासूनच ‘गोबेल्स नीती’ मानव लोकात गाजू लागली. अनेक प्रांतात कटकारस्थाने याच नीतीच्या आधारावर रचली जाऊ लागली आणि फत्तेही होऊ लागली.यमके : असत्याला ‘सत्य’ म्हणून गळी उतरविण्याच्या या गोबेल्स नीतीचा आणि इंद्रदेवांनी बोलावलेल्या आजच्या दरबाराचा काय संबंध?नारद : अरे, १९३३ सालापासून जर्मनीच्या दरबारात आपल्या तंत्राने हिटलर आणि फॅसिस्टांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या या गोबेल्स नीतीच्या जनकाने नरकातून इंद्रदेवांकडे तक्रारी अर्ज सादर केला आहे. त्याला हिटलरचेसुद्धा अनुमोदन आहे म्हणे !यमके : गुरुदेव, नरकातून आलेल्या अर्जाचीही इंद्रदेव एवढी दखल घेतात?नारद : हो, त्यांना दखल घ्यावीच लागते... कारण अशा अर्जांवर स्वर्गलोकातील मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाºयांचा बारीक डोळा असतो. दुर्लक्ष झाले की ते आंदोलनाचे हत्यार उपसतात.यमके : जगावर दुसरे महायुद्ध लादून अमानवी कृत्य करणाºयांचीही दखल का घ्यावी?नारद : दखल तर त्रिलोकाची घ्यावी लागते. म्हणून तर आज खास जोसेफ गोबेल्सच्या तक्रार अर्जावर इंद्र दरबार भरतो आहे.यमके : तक्रार नक्की कशाबद्दल आहे?नारद : तब्बल शतकभर चर्चेत असणारी ‘गोबेल्स नीती’ या नावाने ओळखली जाणारी नीती आता कालबाह्य झाली आहे. अनेकजण स्वत:ची ‘नीती’ वापरतात आणि नाव मात्र गोबेल्सचे देतात. त्यामुळे ज्याच्या-त्याच्या नीतीचे नामकरण ज्याच्या-त्याच्या नावानेच करावे, अशी मागणी गोबेल्सने केली आहे. ‘गोबेल्स नीती’ या नावाचा गैरवापर करणाºयांची यादीच त्याने इंद्रदेवाला सादर केली आहे.यमके : त्या यादीत कुणाची नावे आहेत?नारद : अरे, ट्रम्पपासून मोदींपर्यंतची नावे त्यात आहेत. थोडक्यात काय तर आता ‘गोबेल्स नीती’ ऐवजी ‘ट्रम्प नीती’, ‘मोदी नीती’ आणि अशीच नावे वापरण्याचे बंधन ज्या-त्या क्षेत्रावर घालावे. गोबेल्सची बदनामी करू नये, अशी त्याची मागणी आहे. मराठी भूमीतीलही अनेक नावे आहेत. पाहू त्यांचे काय करायचे ते! 

टॅग्स :newsबातम्याMaharashtraमहाराष्ट्र