शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 12:20 AM

माझ्या मित्राकडे लग्न समारंभाच्या स्वागत समारंभाला परिवारासहित गेलो होतो. नववधू व वर दोघेही बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून लठ्ठ पगारावर सेवेत होते. समारंभाला पोहचलो तेव्हा प्रवेशद्वाराजवळ एक खूपच मोठे फलक लावले होते ज्यामध्ये वर नववधूला कवेत घेऊन गाणे गात आहे, या आशयाचे चित्र चित्रांकित केले होते.

- प्रा. डॉ. संदीप ताटेवारमाझ्या मित्राकडे लग्न समारंभाच्या स्वागत समारंभाला परिवारासहित गेलो होतो. नववधू व वर दोघेही बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून लठ्ठ पगारावर सेवेत होते. समारंभाला पोहचलो तेव्हा प्रवेशद्वाराजवळ एक खूपच मोठे फलक लावले होते ज्यामध्ये वर नववधूला कवेत घेऊन गाणे गात आहे, या आशयाचे चित्र चित्रांकित केले होते. मला एका क्षणापुरता चुकून चित्रपटगृहात आल्याचा भास झाला. प्रचंड थंडीचे दिवस असल्यामुळे रात्री ७.३० ला समारंभ आरंभ होणार होता परंतु रात्री ८.३० वाजेपर्यंत नववधू व वर व्यासपीठावर उपस्थित नसल्यामुळे चौकशी केली तेव्हा दोघेही ब्युटी पार्लरमध्ये गेले असल्यामुळे वेळ होत आहे असे कळले नंतर एकदाचे ९.०० वाजता वधू-वर व्यासपीठावर आले. वधूचा पोशाख देहप्रदर्शनासाठी घातल्यासारखा वाटत होता. नववधूच्या गळ्यात मंगळसूत्र नाही हे सासूच्या लक्षात येताच, त्या धावतच व्यासपीठावर गेल्या व छोटूसं तरी मंगळसूत्र फक्त समारंभापुरता घालण्यासाठी वधूची मनधरणी करू लागल्या पण पोशाखाला मंगळसूत्र साजेसं नाही व गळ्यातसुद्धा आरामदायी वाटत नाही म्हणून वधूने सासूची विनंती साफ नाकारली. वयोवृद्ध व इतर नातेवाईक शुभ आशीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावर जात होते पण वधूवर एखाद्या राजकीय नेत्यासारखे दुरूनच नमस्कार करीत होते. प्रेमानी बोलणे, हसणे व येणाऱ्यांचे स्वागत करणे हा प्रकार कुठेच आढळत नव्हता. आज समाजात पाश्चात्य संस्कृतीचा पगडा सर्वत्र दिसत आहे. शिक्षण व पैशांनी आपण खूप प्रगत झालो व इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहो हा भाव काही प्रमाणात नवीन पिढीमध्ये वाढत असल्याचे दिसत आहे. आज शिक्षणाने जीवनाची मूल्ये वाढवली की ढासळली? आपण सुशिक्षित तर झालो पण सुसंस्कृत झालो का?प्रसंगाचे पावित्र्य राखणे, वडिलधा-यांचा मान राखणे, वेळेचे भान ठेवणे हे संस्कार आपल्यात रूजणे व वयानुसार परिपक्व होणे आवश्यक आहे. सहनशक्ती, सहयोग व प्रसंगानुसार तडजोड करण्याची वृत्ती प्रत्येकांनी जोपासणे अभिप्रेत आहेच. या गुणांच्या अभावामुळेच की काय आज घटस्फोट, नैराश्यता, आत्महत्या असे प्रकार नवीन जोडप्यात वाढत आहे. सुखी संसारासाठी एकमेकांबद्दल व इतरांबद्दल प्रचंड आदर, त्याग, जिव्हाळा, तडजोड, सहनशक्ती हे सद्गुण आवश्यक असते हे नवीन पिढीला विसरून चालणार नाही, हे मात्र खरे!

टॅग्स :marriageलग्नnewsबातम्या