शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
4
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
5
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
6
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
7
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
8
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
9
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
10
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
11
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
12
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
13
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
14
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
15
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
16
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
17
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
18
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
19
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
20
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

इराणमधले गजबजलेले बाजार, कॅरवान सराई आणि हमाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 08:17 IST

अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्तेला वाटाघाटींमध्ये जेरीस आणणारा इराणी माणूस असा का? - इराणमधल्या वास्तव्यात सापडलेलं एक उत्तर!

स्नेहा केतकर, इराणमध्ये काही काळ वास्तव्य.सध्या मुक्काम बंगळुरू

इराण मधले बाजार हा एक अत्यंत खास प्रकार आहे.  हे बाजार मोकळ्यावर मांडलेले नाही, तर नीट बांधलेले असतात. आत जायला प्रवेशद्वार असतं आणि आत गेल्यावर उजवीकडे, डावीकडे नीट बांधून काढलेल्या उंच जोत्यांवर दुकानं असतात. बाजाराचं छत उंच आणि भिंती जाड असतात. उन्हाळ्यात हे बाजार थंड असतात आणि हिवाळ्यात उबदार. हा एक भूलभुलैय्या असतो. इथे कापडापासून सोनं, मसाले, गाद्या, उशा, थोडक्यात जे हवं ते सगळं एकाच ठिकाणी मिळतं. या बाजारात फिरणं आनंददायी असतं. तेहरानमधला बाजार ‘बाजार-ए-बुजुर्ग’ तर शिराझमधील बाजाराचं नाव ‘बाजार-ए-वकील’ असं आहे! तब्रिजमध्ये मी पाहिलेला बाजाराचा एक भाग तर हजार वर्षं जुना आहे. या ठिकाणी उत्तमोत्तम उंची गालिचे विक्रीला होते.

इराणमध्ये गालिचा नाही असं एकही घर दिसणार नाही.  विविध आकाराचे, रंगसंगतीचे, वेगवेगळी चित्रं, नक्षीकाम असलेले गालीचे प्रत्येक घरात आढळतात. ज्या घरात आम्ही भाड्याने राहत होतो तिथेही घरमालकांनी दिलेले सुंदर गालिचे होते. कॅरवान, सराई आणि हमाम हे तीन शब्द ऐकले नाही तर आपण इराणला गेलोच नाही असं समजावं इतके हे तीन शब्द इराणी माणसाच्या आणि तेथील संस्कृतीच्या जिव्हाळ्याचे आहेत. त्यातील कॅरवान आणि सराई हे अनेकदा ‘कॅरावानसराई’ असे एकत्र एका शब्दासारखेच म्हटले जातात. पूर्वीच्या काळी व्यापारउदीम करत दिवसभर मैलोनमैल अंतर मजल-दरमजल करत तुडविणारे व्यापारी, त्यांचा माल आणि सामान वाहून आणणारे त्यांचे उंट यांना सुरक्षित ठेवण्यासाठी या कॅरावान सराया. वाळवंटातील हवा अतिशय उष्ण आणि अतिथंड. तिथे होणारी वाळूची वादळंही तीव्र स्वरुपाची असतात. कॅरवान सरायांमध्ये या सगळ्यापासून संरक्षण मिळतं.  

इराणचे हमामही प्रसिद्ध आहेत. व्यापारउदीम करणाऱ्या माणसांना आंघोळ करून ताजंतवानं व्हायला मिळावं यासाठी केलेली सोय म्हणजे हे हमाम. पण शिराझ, इस्फाहान, तब्रिजमधले हमाम खरोखरच पाहण्यासारखे आहेत. गरम पाणी, मालिश, पाण्यात सुवासिक अत्तरं.. असा सगळा आलिशान कारभार असलेले हे हमाम म्हणजे त्या काळचे ‘स्पा’ होते. प्रचंड मोठ्या हवेलीसारखे भासणारे भव्य हमाम. ३००-४०० वर्षांपूर्वीचा विचार केला तर डोंगराळ भागातून  मालाची ओझी वाहणारे उंटांचे तांडे आणि त्यांच्याबरोबर प्रवास करणारे व्यापारी डोळ्यासमोर येतात. 

या थकवणाऱ्या प्रवासानंतर हे हमाम आंघोळीसाठी त्यांना किती उपयोगी पडत असतील! थकल्या भागलेल्या व्यापाऱ्यांना, मजुरांना आणि कष्टकऱ्यांना त्यातून किती विसावा मिळत असेल याची कल्पना केली तरी त्या काळच्या माणसाचं आणि त्याच्या कल्पनाशक्तीचं कौतुक वाटतं. कॅरवान, सराया आणि हमाम हा इराणच्या इतिहास आणि संस्कृतीतला एक अविभाज्य भाग आहे.  अनेक अडचणींवर मात करत व्यापार उदीम करणारा चिवट माणूस त्यात दिसतो. माझ्या इराणमधील वास्तव्यात मी पाहिलेला, आता अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्तेला वाटाघाटींमध्ये जेरीस आणणारा इराणी माणूस असा का, याचं उत्तर त्या विजिगीषू वृत्तीत आहे, हे मनोमन उमगतं.     snehasanjayketkar@gmail.com

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's Bustling Bazaars, Caravanserais, and Hammams: A Cultural Journey

Web Summary : Iran's markets, caravanserais, and hammams showcase its rich history. Bazaars offer diverse goods within unique architecture. Caravanserais provided safety for traders. Hammams, luxurious bathhouses, offered respite. These sites reveal Iranian resilience and cultural heritage.
टॅग्स :Iranइराण