शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - आकाश आनंदाचे

By admin | Updated: January 12, 2017 00:20 IST

आकाश हे निर्मळ, अभेद्य, अलिप्त आणि सर्व पदार्थांशी समान भाव धरणारे आहे. ते विषमान असून सम, संगात असून असंग आणि भेद करू गेलात तरी अभेदत्वात संपत नाही.

आकाश हे निर्मळ, अभेद्य, अलिप्त आणि सर्व पदार्थांशी समान भाव धरणारे आहे. ते विषमान असून सम, संगात असून असंग आणि भेद करू गेलात तरी अभेदत्वात संपत नाही.वैर आणि निर्वैैर हे आकाशाला ठाऊक नसते. म्हणून आकाशाला गुरुत्व बहाल केले आहे. भारतीय संस्कृती अशीच उत्तुंग आहे. ती माणसाला आकाशासारखे निर्मळ, सर्वसमावेशक, आणि व्यापकत्व देते. या व्यापक जनविश्वात आपण किती लहान आहोत याची जाणीव व्हावी आणि त्या जाणीवेतून जीवनाचा आनंद घेण्याची आणि देण्याची वृत्ती वाढीस लागावी म्हणून तर मानवी जीवनाला रमविणाऱ्या, रंगविणाऱ्या कला आल्या. साहित्य आले. संस्कृती आली, लोकसंस्कृती आली. स्वत:च्या जीवनात दु:खाचे, वेदनेचे आणि प्रतिकूलतेचे अनेक ढग येतात, पण त्या साऱ्यांना परतवून आनंदाचा पाऊस पाडणारे आकाश प्रत्येकाला लाभले आहे.जगताना प्रत्येकाला स्वत:चे आकाश हवे. त्या आकाशातून धरणीवर पडणाऱ्या सुखदु:खाच्या जलधारा हव्यात. काळ्या ढगांप्रमाणे दाटून यावे आणि ढगातलं सारं पाणी देऊन म्हणजे सर्वस्व देवून पुन्हा मोकळे व्हावे, हे मोकळेपण आनंदाच्या आकाशातच गवसते. इथेच जीवनाच्या आणि मानवी मनाच्या सप्त रंगाचे इंद्रधनुष्यही पहायला मिळते. मरगळलेल्या जड मनाला पुन्हा साजिवंत करणारा स्फूर्तीचा वारा याच आकाशात घोंघावतो आणि मनसोक्तपणे विहार करणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे मनही भरारी घेतंं. ही भरारी आनंदाची आहे. मुक्ततेची आहे. प्रसन्नतेची आहे, अनासक्ततेची आहे. जाणीवेची आहे.आकाश हेच एक संस्कृती आहे. हेच आकाश जेव्हा मानवी जीवनात स्वाभाविकपणे अवतरते तेव्हाच एक संस्कृती जन्म घेते. ती संस्कृती मानवी जीवनाला सुखावते, आनंदित करते, जगण्याची मूल्य देते, कला, अध्यात्म आणि मानवी सौंदर्याची अनुभूती देते. खरे तर जगण्यातली स्वाभाविकता म्हणजे संस्कृती. ती जेव्हा लोकजीवनाशी एकरुप होते, लोकजीवनाशी नात्याने बांधली जाते. तेव्हा तीच लोकसंस्कृती होते. खेळ, सण, उत्सव, वारी, पालखी, दिंडी, लोककला, कीर्तन, नृत्य, नाट्य या साऱ्यातून लोकसंस्कृतीच्या वेली विस्तारल्या आनंदाने बहरल्या. सुखाचा फुलोरा देत फुलल्या, त्यात लोकभूमिका आल्या, लोककला आल्या, लोकवाणी आली, लोकाचार आले आणि लोकजीवनातील एक आनंदाचे आभाळ लोकसंस्कृतीने उभे केले. डॉ. रामचंद्र देखणे