शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीकरांचे दातृत्व...!

By admin | Updated: April 15, 2016 04:31 IST

‘नाम’ची प्रेरणा घेऊन बार्शीच्या शिवाजी शिक्षण संस्था व भगवंत देवस्थान दुष्काळग्रस्तांना मदत करतात. राज्यातील शिक्षणक्षेत्राने आणि नामांकित देवस्थानांनी देखील तशीच

- राजा माने

‘नाम’ची प्रेरणा घेऊन बार्शीच्या शिवाजी शिक्षण संस्था व भगवंत देवस्थान दुष्काळग्रस्तांना मदत करतात. राज्यातील शिक्षणक्षेत्राने आणि नामांकित देवस्थानांनी देखील तशीच प्रेरणा घेतली तर.....कुठलेही संकट असो, संकटग्रस्तांच्या मदतीला धावण्याची सहवेदना असेल तर दिलाशाबरोबरच त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्गदेखील सापडतो. सध्याच्या आसमानी दुष्काळी संकटाला सामोरे जाण्याचे बळ नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंच्या ‘नाम’ने दिले. त्या बळाने महाराष्ट्रात दातृत्वाचा पाझरदेखील फोडला! अनेकांनी त्यांची प्रेरणा घेऊन दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावण्याचा निर्धार केला. शिक्षणाच्या प्रसारासाठी कर्मवीर भाऊरावअण्णा पाटील यांनी एका जमान्यात ‘मूठभर धान्य’ ही चळवळ गावागावात राबविली आणि रयतचा शिक्षणवृक्ष ग्रामीण भागात वाढला व जोपासला गेला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांनी शैक्षणिक चळवळ उभी केली. शिवाजी शिक्षण मंडळ नावाने त्यांनी सुरू केलेल्या या चळवळीने नेहमीच ग्रामीण माणूस आणि शेतकऱ्यांशी असलेली आपली नाळ अतूट राखली. तीच परंपरा आणि ‘नाम’ची प्रेरणा घेऊन याच शिक्षण संस्थेने आपला भाग दुष्काळाने होरपळत असताना गप्प न राहण्याचा निर्णय घेतला.अवर्षण या संकटाचे ओझे घेऊन दुष्काळाशी लढत राहण्याची जणू सवयच शेतकऱ्याला आता झाली आहे. कायमच्या दुष्काळमुक्तीसाठी पाण्याचे शाश्वत स्रोत निर्माण करून ते जतन करण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही. या वास्तवाची जाणीव बांधाबांधांवर पोहोचण्याची गरज आहे. नेमक्या त्याच जाणिवेला बळकटी देण्याचे काम शिवाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, सचिव बापूसाहेब शितोळे आणि त्यांच्या टीमचे सदस्य व्ही. एस. पाटील, पी. टी. पाटील, नंदन जगदाळे, प्रा. दिलीप रेवडकर, प्राचार्य डॉ. व. न. इंगळे, प्राचार्य चंद्रकांत मोरे, प्राचार्य एस. के. मोरे, सुरेश पाटील, अरुण देबडवार आणि एस. ए. पाटील यांनी केले. पदरमोड करून दुष्काळग्रस्तांना मदत केली पाहिजे, या भावनेतून संस्थेतील प्रत्येक घटकाने निधी दिला आणि पाहातापाहाता ही रक्कम १५ लाख रुपयांपर्यंत पोहोचली. या रकमेतून आपल्याच भागात जलसंवर्धन व्हावे, या भावनेने या संस्थेने तो निधी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे सुपूर्द केला.देशात एकमेव म्हणून बार्शी येथील श्री भगवंत मंदीर ओळखले जाते. ग्रामदैवत असलेल्या या देवस्थाननेही या कामात मागे न राहण्याचा निर्णय घेतला. देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब बुडूख, मुकुंद कुलकर्णी, मिठूभाऊ सोमाणी, नानासाहेब सुरवसे, अनिल देशमुख यांनी देवस्थानच्या वतीने दोन लाख रुपये मदतनिधी दिला. आता या दोन्ही संस्थांच्या मदतीने १७ लाख रुपयांची कामे शाश्वत पाण्याच्या स्रोत संवर्धनासाठी होतील.खरे तर राज्यात जवळजवळ पाच हजार महाविद्यालये आहेत. साडेपाच हजार मंदिरे आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत असलेली असंख्य देवस्थाने आहेत. शिर्डी, सिद्धिविनायक, दगडूशेठ हलवाईसारख्या काही देवस्थानांचा व्यवहार कोटी-कोटींच्या घरात आहे. शिक्षण संस्था आणि देवस्थानांनी मनावर घेतल्यास दुष्काळग्रस्तांना खूप मोठी मदत होऊ शकते, हा संदेशच बार्शीकर संस्थांच्या दातृत्वाने दिला आहे.या निमित्ताने बार्शी तालुक्यातील सावरगाव या छोट्याशा गावात तलावाच्या कामासाठी मिलिंद सुरवसे आणि बापू सुरवसे यांनी दिलेल्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. त्यांनी वैयक्तिक २५ लाख रुपये खर्च करून आपल्या गावातील तलाव उभारणीच्या कामाला गती दिली आहे. संतोष ठोंबरे, प्रतापराव जगदाळे, अजित कुंकूलोळ, मुरलीधर चव्हाण, मधुकर डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली मातृभूमी प्रतिष्ठाननेदेखील तब्बल सात गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली आहेत. या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार योजना कामात राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या सोलापूर जिल्ह्यावर मान्सूनची कृपा झाली तर आनंदीआनंद होईल.