शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

दृष्टिकोन: एक लेखक त्याचं गाव सोडून जातो म्हणजे नेमकं काय होतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 3:16 AM

दहा-वीस जणांच्या भरल्या घरात एखाद्याला एकटं वाटू लागलं तर तो दोष त्या व्यक्तीचा कसा? त्याला एकटं का वाटतं याचा विचार घरातल्या बाकीच्यांनी करायचा असतो

अतुल कुलकर्णी, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमतएक लेखक आपली हयात ज्या गावात घालवतो ते गाव स्वत:च स्वत:च्या जीवंतपणी सोडून जातो म्हणजे काय होतं..? ज्या गावात, घरात त्यानं अनेक दुर्मीळ पुस्तकांना जन्म दिला, अमोल असा ठेवा जगाला दिला, मोठा इतिहास शब्दबद्ध केला, ते गाव, ते घर सोडून लेखक आपल्या मूळ गावी जातो म्हणजे काय होतं..? का असं एकाकीपण आयुष्याच्या शेवटाला येतं..? लौकिकार्थाने सगळं काही मिळवूनही असं काय मिळवायचं शिल्लक राहातं..? म्हणून तोच लेखक त्यासाठी स्वत:च्या जन्मगावी जायला तयार होतो..? मारुती चितमपल्ली यांनी आपली कर्मभूमी असणारं नागपूरचं घर सोडून स्वत:च्या गावी, सोलापूरच्या घरी जाण्याचा निर्णय घेतल्याची बातमी वाचल्यापासून हे अस्वस्थ प्रश्न मनात आहेत. ही अशी अस्वस्थता निर्माण करून, आपली सगळी ग्रंथसंपदा आणि थोडेबहुत सामान घेऊन ते शनिवारी नागपूरहून आपल्या गावाकडे गेलेदेखील...

वर्तमानपत्रात बातम्या आल्या, हळहळ व्यक्त झाली. एखादं चॅनल आता ही बातमी धीरगंभीर आवाजात दाखवून भावनिक टीआरपीची बेगमी करेलही, पण पुढे काय..? इथे तर एक लेखक आपल्या आयुष्याचं ८८ वर्षांचं झाड, मुळासकट उपटून पुन्हा आपल्या मूळ गावी नव्याने लावायला जातोय..! तो ज्या गावात त्याच्या आयुष्याचं झाड पुन्हा नव्याने लावणार आहे ती माती भलेही त्याची जन्मभूमी असेल; पण ते अनुभवानं गच्च भरलेलं झाड पुन्हा त्या नव्या मातीत रुजेल का?

एक लेखक आपलं दाणापाणी संपलं म्हणून राहातं गाव सोडून जातो; त्याचा आमच्या जगण्यावर, आमच्या गावावर, आमच्या भावभावनांवर काहीच परिणाम का होत नाही..? आमच्या संवेदना आतून विस्कटून का जात नाहीत..? की आमची नाळ फार पूर्वीच तुटून गेलीय या सगळ्यापासून..? कळत न कळत त्या लेखकाने आमच्या असण्यावर, आमच्या वागण्या-बोलण्यावर काही परिणाम केले असतील की नाही..? याचाही विचार हल्ली मनाला का स्पर्श करत नाही..?

एखाद्या अभिनेत्याच्या आत्महत्येमुळे आपण हरतºहेने व्यक्त होतो... एखाद्या अभिनेत्रीच्या टीवटिवीवर भरभरून मतं मांडतो... एखाद्या राजकीय घटनेवर कधी या, कधी त्या बाजूने सतत बोलत राहातो... कधी स्वत:ला देशभक्त म्हणवून घेतो, तर कधी दुसऱ्यांना देशद्रोही ठरवत भांडत राहातो, मात्र एक लेखक असा आपली मुळं उचकटून जातो, तेव्हा आपल्या मनावर एक साधा तरंगही उमटू नये? आपल्याला काही म्हणजे काही वाटू नये? एरव्ही तावातावाने भांडणाºया आपल्या साहित्यसंस्था? संस्कृतीच्या नावानं सतत गळे काढणारं आपलं सरकार? आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात काही व्यक्तिगत अडचणींमुळे एकांतवासाचा सामना करणाºया आणि तरीही नवनव्या प्रकल्पांमध्ये जीव ओतून कार्यरत असलेल्या लेखकाच्या बाबतीत आपलं काही कर्तव्य आहे, असं यातल्या कुणालाच वाटू नये? - की सत्काराच्या शाली पांघरल्या म्हणजे संपली जबाबदारी? आयुष्याच्या अनुभवांची शिदोरी अंतापर्यंत सोबत देणारा लेखक गाव सोडून गेला तेव्हा नागपुरातल्या एकाही संवेदनशील राजकारण्याला दु:ख झालं नाही... का? कोणतंही गाव ओळखल जातं ते तिथल्या संस्कृती, साहित्यिक, विचारवंतांमुळे! बलाढ्य नेते अगर उत्तुंग इमारतींमुळे नव्हे!!

पंडित जवाहरलाल नेहरू एकदा लाल किल्ल्यावर कार्यक्रमाला गेले होते. तेथे चालताना पाय अडखळून त्यांचा तोल गेला, तेव्हा जवळच उभ्या असलेल्या कवी रामधारीसिंग दिनकर यांनी त्यांना सावरलं. नेहरूंनी त्यांना धन्यवाद दिले, सॉरीही म्हटलं; तेव्हा कवी दिनकर म्हणाले, पंडितजी, सॉरी म्हणू नका... राजसत्तेचे पाय जेव्हा डगमगतात तेव्हा साहित्य आणि साहित्यिकच त्यांना आधार देण्याचं काम करतात!’- आता हे कोण कुणाला सांगणार? अ‍ॅडॉल्फ सॅक्स यानं १८४० मध्ये सॅक्सोफोनचा शोध लावला. बेल्जियममधल्या डिनांट गावात तो १८१४ मध्ये जन्माला आला. २०६ वर्षं उलटून गेली, तरी त्या गावात आजही वेगवेगळ्या आकारातल्या सॅक्सोफोनच्या शेकडो प्रतिकृती चौकाचौकांत लावून ठेवलेल्या आहेत... त्या श्रेष्ठ वादकाची आठवण म्हणून!- इथेतर एक जीवंत लेखकच गावातून त्याच्या अनुभवाचं झाड मुळासकट उपटून निघून गेलाय; तरी कुणाला काही वाटू नये?

जाता जाता : दहा-वीस जणांच्या भरल्या घरात एखाद्याला एकटं वाटू लागलं तर तो दोष त्या व्यक्तीचा कसा? त्याला एकटं का वाटतं याचा विचार घरातल्या बाकीच्यांनी करायचा असतो... कसदार लेखनापायी ज्याने आपलं आयुष्य उधळलं; त्या ॠषितुल्य माणसाला आपण सोबत देऊ शकलो नाही, हेच अस्वस्थ सत्य!

टॅग्स :environmentपर्यावरणforestजंगल