शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
2
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
3
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
4
१८ व्या वर्षी तुमचं मुल होईल कोट्यधीश! SSY, NPS आणि PPF सह 'या' ६ योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक
5
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
6
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
7
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
8
Tips: कामाच्या ठिकाणी होणारे मतभेद मिटवण्यासाठी ६ सोप्या टिप्स!
9
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
10
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
11
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
12
शाळांच्या सहलीसाठी मिळणार 'एसटी'च्या नव्या बसेस; विद्यार्थ्यांना घेता येणार संस्मरणीय अनुभव
13
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
14
Farming: ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार ५० हजार
15
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
16
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
17
Bigg Boss 19: शिव ठाकरेचा 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला फूल सपोर्ट! प्रणित मोरेसाठी केली पोस्ट, म्हणाला- "भाऊ..."
18
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
19
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
20
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
Daily Top 2Weekly Top 5

लेख: वडगाव तालुक्यात नवे काही घडत आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 08:59 IST

Vadgaon Maval: एकेकाळी वाडी असलेले हे गाव स्वतंत्र अकरा हजार लोकवस्तीचे तालुका शहर झाले आहे.

दिनकर गांगल,वडगाव-मावळचे अजित देशपांडे आहेत तसे मितभाषी, समोरच्या माणसाचा मान राखणारे; परंतु ते बोलू लागले, की पुणे परिसरातील इतिहासप्रसिद्ध प्रगल्भतेची किरणे त्यांच्या तोंडून प्रकटू लागतात. त्याहून त्यांना असलेला सोस म्हणजे त्यांच्या ज्ञानसंशोधनाची माहिती दुसऱ्याला द्यावी असा. त्यासाठीही ते झटत असतात.

अजित यांची वाढ संस्कारशील कुटुंबात झाली. आजोबांनी घरातील गणपतीपूजेचा पंथ त्यजून, देहूला जाऊन तुकारामाचा वारकरी पंथ स्वीकारला. ते तेथेच राहू लागले. वडील शिक्षक होते - त्यांनी गावचे वतन सोडायचे नाही, म्हणून शिक्षकी पेशा टाकून ग्रामसेवकाची नोकरी पत्करली. त्यांनी मोठ्या कुटुंबाचा सांभाळ केला, पण त्याहून अधिक आनंदाने सार्वजनिक सेवेचे पद निभावले, गावात सुधारणा केल्या.अजित यांचे शिक्षण-नोकरी धडपडत झाले. पन्नास वर्षांपूर्वी काळही अभावाचा होता. 

अजित यांनी शालेय शिक्षण, कॉम्प्युटरचा कोर्स करून जुन्नर कोर्टात नोकरी पत्करली. वास्तविक, एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात गेलेला तो मुलगा, त्याची नोकरी सरकारी; पण अजित यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला. पुणे विद्यापीठातून तीन विषयांत पदव्युत्तर पदव्या मिळवल्या. त्याहून महत्त्वाचे म्हणजे शोभना गोखले, मंजिरी भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पुरातन भारतविद्येचे सखोल धडे घेतले आणि नोकरीची एकवीस वर्षे झाली, तेव्हा स्वेच्छानिवृत्ती घेऊन अजित देशपांडे सर्ववेळ अभ्यास संशोधनाच्या मार्गाला लागले.

वडगाव-मावळ वाटते तळेगावचे उपनगर, पण एकेकाळी वाडी असलेले हे गाव स्वतंत्र अकरा हजार लोकवस्तीचे तालुका शहर झाले आहे. तेथे महादजी शिंद्यांनी इंग्रजांना पराभूत केले - जवळच दोन हजार वर्षांपूर्वीच्या कार्ले-भाजे लेण्यांपासून शंभर वर्षांपूर्वीच्या रवि वर्मा यांच्या छापखान्यापर्यंतचा इतिहास घडला. अजित देशपांडे गेली आठ वर्षे अशा साऱ्या खुणा जपण्याच्या मागे लागले आहेत. त्यांनी भाजे लेण्यांचा व्हिडिओ बनवला. संस्कृतीविषयक सत्तर लेख फेसबूकवर लिहून सर्वत्र पसरवले. ‘आपलं वडगाव’ नावाचा माहितीपर दिवाळी अंक प्रसिद्ध केला. रंगचित्रांचे परीक्षण हा त्यांचा आणखी एक छंद. ते जुनी, अभिजात रंगचित्रे मुलांना दाखवतात, स्वत: त्यांवर लिहितात, मुलांना लिहिण्यास प्रवृत्त करतात.

त्यांनी ‘मावळ विचार मंच’ या व्यापक व्यासपीठाच्या अंतर्गत, त्यासाठी ‘साहित्य-कला-संस्कृती मंडळ’ निर्माण केले आहे. त्यांनी परिसराची माहिती संकलित करण्यासाठी तीस जणांचा चमू जमा केला आहे - त्या लोकांचा विविधांगांनी विकास व्हावा म्हणून ते अनेक तऱ्हांचे धडे त्यांना देत असतात. अभिवाचन हा त्यातील एक मंत्र. त्यामुळे ती मंडळी वाचनास उत्सुक झाली. नृत्य-नाट्य-अभिनय हा दुसरा मंत्र. यामुळे शालेय मुलामुलींपासून सर्व पालकमंडळी सांस्कृतिक कार्यात गुंतू लागली. असे वेगवेगळे गट वडगावात कार्यमग्न असतात. खरे तर, असे कार्यक्रम शिक्षणसंस्थांशी निगडित समजले जातात. अजित देशपांडे यांच्या पुढाकाराने ते गावपातळीवर आले आहेत - वडगाव तालुक्यात नवजागरण घडत आहे!

English
हिंदी सारांश
Web Title : Vadgaon Taluka Transformation: Ajit Deshpande Leads Cultural and Educational Revival

Web Summary : Ajit Deshpande spearheads a cultural and educational renaissance in Vadgaon. Through 'Maval Vichar Manch,' he fosters community development via literature, arts, and culture, engaging locals in diverse activities and sparking a village-level awakening.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र