शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
2
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
3
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
4
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
5
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
6
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
7
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
8
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
9
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
10
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
12
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
13
१८ व्या वर्षी तुमचं मुल होईल कोट्यधीश! SSY, NPS आणि PPF सह 'या' ६ योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक
14
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
16
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
17
विशेष लेख: आळशी मावशी ! केवळ कोंबडीमुळं बिबट्या बिघडला... इकडं धूर.. तिकडं जाळ
18
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
19
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
20
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: युती म्हणून लढायचे की जानी दुश्मन म्हणून...?

By अतुल कुलकर्णी | Updated: November 16, 2025 11:35 IST

शिवसेना, राष्ट्रवादीची दोन घरांची चार घरं झाली. मात्र, गावागावात एकाच घराची सहा सहा घरं झाली आहेत...

अतुल कुलकर्णी संपादक, मुंबईलोकसभा निवडणुकीत मोदीजींचे हात बळकट करायचे म्हणून आम्ही झोकून देऊन काम केले. विधानसभेला फक्त देवाभाऊंसाठी मनाला मुरड घातली. पार्थचे प्रकरण बाहेर येताच आमच्या सौ.ने आम्हाला खूप झापले. तिला भाजपला मतदान करायचे होते. पण भाजपचा उमेदवार नसल्यामुळे तिला दादांच्या उमेदवाराला मतदान करावे लागले होते. त्याचा राग मनात धरून तिने आम्हाला आज चहा पण दिला नाही. सौ. च्या माहेरी दादांना मतदान करायचे होते. मात्र, तिथे त्यांचाही उमेदवार नसल्यामुळे त्यांनी म्हणे नाईलाजाने कमळाचे बटन दाबले... तर पोराच्या सासुरवाडीत शिंदेसेनेच्या उमेदवाराला मतदान करायचे होते, पण तिथे त्यांचा उमेदवार नव्हता म्हणून त्यांनी इच्छा नसताना दुसऱ्याला मतदान केले... आमच्या घरचे सोडून द्या... प्रत्येक घरात अशी उभी फूट पडली आहे.

एकाच घरात भाजप, शिंदेसेना आणि काँग्रेसचा कार्यकर्ता एका छताखाली राहतो. घराबाहेर पडले की एकमेकांच्या विरोधात घोषणा देतो. शिवसेना, राष्ट्रवादीची दोन घरांची चार घरं झाली. मात्र, गावागावात एकाच घराची सहा सहा घरं झाली आहेत... “कुठे नेऊन ठेवला गाव माझा” असे तुम्हाला विरोधक म्हणतील. मात्र तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका. विरोधक नुसते बोलतात. प्रत्यक्षात काहीच करत नाहीत, हे सगळ्या महाराष्ट्राला कळाले आहे. पार्थचे प्रकरण बाहेर आल्यावर विरोधकांनी जोरदार पत्रकार परिषदा घेतल्या. आरोप करून शांत बसले. ते दुसरे काहीही करू शकत नाहीत. 

तुम्ही विरोधात असता तर आतापर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक गाव पिंजून काढले असते. पार्थ, दादा यांच्या विरोधातले गाडीभर पुरावे लोकांना दाखवले असते... जलसिंचनातल्या ७० हजार कोटीच्या घोटाळ्यातले गाडीभर पुरावे दाखवले होते अगदी तसे... महागाई वाढली म्हणून सिलिंडर डोक्यावर घेऊन आंदोलन केले होते, तसे आंदोलन फक्त तुम्हीच करू जाणे... विद्यमान काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी अशी आंदोलने करणे सोडून दिले आहे. त्या बदल्यात तुम्ही त्यांच्या दोन-चार फायली क्लीअर करून द्या. आता पार्थचेच बघा ना. “तो असे काही करू शकेल असे मला वाटत नाही” अशी पहिली क्लीनचिट सुप्रिया सुळे यांनी दिली. इतका प्रभावी विरोधक असल्यावर तुम्हाला चिंता करायची गरज नाही...

आता निवडणुकीत कार्यकर्ते तुम्हाला आग्रह करतील. लोकसभा, विधानसभेला तुमच्यासाठी कष्ट केल्याच्या कहाण्या सांगतील... तुम्हालाच तिकीट देतो, असे तुम्ही आश्वासन दिल्याची आठवण करून देतील... आम्ही किती वेळा तुमच्या दिवाळीला आकाश दिवे करायचे, असेही विचारतील... असे म्हणणाऱ्या प्रत्येकाला लोकसभा, विधानसभेत दिलेल्या गांधीजींच्या फोटोंचा हिशोब मागा... किती फोटो कुठे लावले? उरलेले फोटो कोणत्या कपाटात ठेवले, याचा जाब विचारा... मग बघा, सगळे कसे गप्पगार बसतील. तुम्ही ज्याला तिकीट द्याल त्याचे काम करू, असेही सांगतील... फार फार तर आणखी थोडे गांधीजींचे फोटो मागतील... जास्ती फोटो मागणाऱ्यांना शिंदेसेनेकडे पाठवा... ते दिलदार आहेत... 

जे कार्यकर्ते आपल्या निवडणुकांमध्ये सतरंज्या उचलायचे, त्यांना त्यांचे काम करू द्या. ते त्यात तरबेज झाले आहेत. झेडपी, पालिका, महापालिकेच्या निवडणुकीत अन्य पक्षातील हिस्ट्रीशीटर शोधा. महिलांसाठी वॉर्ड आरक्षित असेल तर अन्य पक्षातील नेत्यांची बहीण, बायको उत्सुक असेल तर त्यांना तिकीट द्या. आपल्या पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते सतरंज्या टाकायला तयारच असतील..  सोलापुरात आपण आपल्याच पक्षातील नेत्याच्या विरोधकांना पक्षात घेऊन टाकले. त्यामुळे तिथे विरोधकच शिल्लक नाही. कोणाला तिकीट द्यावे, यासाठी आपल्याच पक्षात जो “टोकाचा सुसंवाद” सुरू आहे, तोच पॅटर्न सगळीकडे राबवायला हरकत नाही. आपल्याला आपला पक्ष मोठ्ठा करायचा आहे... तेव्हा आजपर्यंतची दोस्ती विसरा. एकमेकांच्या विरोधात जानी दुश्मनासारखे उभे राहा. निवडून आल्यानंतर आपण पुन्हा एकत्र येऊ... सगळेच विरोधक, सगळेच सत्ताधारी या न्यायाने आपण सगळ्यांना सत्तेचा थोडा थोडा लाभ देऊ, एवढाच संदेश महाराष्ट्रभर द्या. मग बघा काय होते ते...तुमचाच, बाबूराव

English
हिंदी सारांश
Web Title : Alliance or Animosity: A Political Strategy for Maharashtra Elections?

Web Summary : Internal strife plagues parties as loyalties shift. Babu Rao advises prioritizing party growth over old alliances, even embracing temporary animosity for electoral gains. Offer positions to all after winning.
टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा