शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

दृष्टिकोन - शहानिशा सोशल मीडियावरील फेकमफेकीची

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 6:54 AM

वैयक्तिक आणि व्यवसायिक अशा दोन्ही प्रकारांत आपल्याला घरबसल्या जगाची ओळख करून देणारी संवादमाध्यमे म्हणजे फेसबुक, टिष्ट्वटर आणि इंस्टाग्राम असे थोडक्यात म्हणता येईल.

डॉ. दीपक शिकारपूर वैयक्तिक आणि व्यवसायिक अशा दोन्ही प्रकारांत आपल्याला घरबसल्या जगाची ओळख करून देणारी संवादमाध्यमे म्हणजे फेसबुक, टिष्ट्वटर आणि इंस्टाग्राम असे थोडक्यात म्हणता येईल. घरोघरी मातीच्या चुली या म्हणीची जागा ‘घरोघरी स्मार्टफोन व सोशल मीडिया’ने घेतली आहे. शाळा, कॉलेजनंतर जगभर विखुरलेल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक पुन्हा भेटवणारे आणि उद्योग-व्यवसायाच्या नवनवीन (व कधीकधी अनपेक्षित देखील) संधी मिळवून देणारे हे संवादमंचसुद्धा त्रासदायक ठरू शकतात, याला कारण म्हणजे अनेक व्यक्ती या प्रतिबंध नसलेल्या माध्यमाचा गैरवापर करत आहेत.

नुकताच एका वरिष्ठ केंद्रीय मंत्री व त्यांची तरुण मुलगी असा फोटो अनेक समाज माध्यमात व्हायरल झाला. नंतर असे वृत्त आले की, सदर फोटोमधील मुलगी ही त्यांची नसून एक भारतीय सेनेतील अधिकारी आहे, अशा अनेक खोट्या बातम्या आजकाल पसरत आहेत. फेक न्यूज म्हणजेच खोट्या बातम्या. याला ‘होक्स’ असेही नाव आहे. अशा बातम्या कोणत्याही प्रकारच्या असू शकतात. राजकारण आणि अर्थकारणापासून आज पृथ्वीवर सूर्याकडून कॉस्मिक रेजचा मारा होणार आहे, तरी सावध राहावे, यापर्यंत काहीही यात असू शकते.अशा बातम्यांना मसाला व्हॅल्यू उर्फ टीआरपी जास्त असल्याने, सोशल मीडियावर त्या अतिशय झपाट्याने पसरतात. रशिया, मॅसेडोनिया, रुमानिया आणि काही प्रमाणात अमेरिका येथून या प्रकारच्या बातम्या उत्पन्न केल्या जातात आणि भारतासहित जर्मनी, इंडोनेशिया, स्वीडन, अमेरिका, फिलिपीन्स अशा देशांना यातून राजकीय किंवा आर्थिक अफवांना सामोरे जावे लागले आहे.

फेक न्यूजबाबतचे आपल्याकडचे एकच उदाहरण पुरेसे बोलके आहे. ८ नोव्हेंबर, २0१६ला आपल्याकडे नोटाबंदी लागू झाली आणि जुन्या ५00 रु. व १000 रु.च्या नोटांऐवजी सरकारने दोन हजारांची नवी नोट सादर केली. या नव्या नोटेत एक सूक्ष्म चिप बसवलेली असून, तुम्ही नोटा जमिनीत खोलवर पुरून ठेवल्यात, तरी त्या ट्रॅक होऊ शकतात, अशी बातमी पसरली. नोटाबंदीचा निर्णय काळ्या पैशाच्या संदर्भात घेतला असल्याचे सरकारने सांगितल्याने हिला अधिकच वेग आला. त्या वेळी भारतात स्मार्टफोन व्हॉट्सअपचे सुमारे पाच कोटी वापरकर्ते होते. त्यांपैकी बहुतेकांनी ही बातमी फॉरवर्ड केली. खुद्द अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बॅँकेने या बातमीचे निराकरण करूनही ती बरेच दिवस चर्चेत राहिली.

खोट्या बातम्यांची शहानिशा करणे, सर्वसामान्य वापरकर्त्याला सोपे आहे. यासाठी फक्त आपल्या संगणकाचे किंवा स्मार्टफोनचे नेट कनेक्शन (उर्फ डेटापॅक) वापरावे लागते, तेही अगदी थोडा वेळ. ही तपासणी करण्याचे मूलत: दोन मार्ग आहेत. पहिला म्हणजे बातमीचे मूळ शीर्षक (किंवा त्यातील महत्त्वाचे शब्दप्रयोग) कॉपी करून शोध-पट्टीत पेस्ट करायचे. आपल्या शंकेचे योग्य उत्तर बहुधा काही सेकंदांतच मिळते, दुसरा मार्ग म्हणजे असा संस्थांच्याच साइटवर जायचे आणि तिथे हाच प्रश्न टाइप करायचा. खोट्या बातम्या पसरविण्यात (जगभरचेच) राजकीय पक्ष आणि त्यांच्या संलग्न संघटना आघाडीवर आहेत, हे वेगळे सांगायचीही गरज नाही, परंतु सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांमध्येही एकंदरीने जागरूकता वाढत चालल्याने बातम्यांची सत्यता पडताळणाऱ्या या आणि अशा वेबसाइट्सवरचा ट्रॅफिकदेखील वाढला आहे, विशेषत: गेल्या पाच-सात वर्षांत, असे निरीक्षण आहे.  अर्थात, वापरकर्त्यांनीही बातम्यांची पडताळणी करताना स्वत:च्या अंतर्मनाचे ऐकून केवळ विशिष्ट बातम्याच न तपासता न्यूट्रल म्हणजे संतुलित मानसिकता ठेवावी.( लेखक विज्ञानविषयक तज्ज्ञ आहेत )

टॅग्स :SocialसामाजिकSocial Mediaसोशल मीडिया