शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

दृष्टिकोन: पर्यावरणपूरक हरित-माहिती तंत्रज्ञानाचा होतोय विकास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 03:27 IST

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये या नवविचाराला ‘ग्रीन आयटी’ उर्फ‘हरित-माहिती तंत्रज्ञान’ असे नाव पडले आहे. यामध्ये ऊर्जास्रोतांचा कार्यक्षमतेने व पुरेपूर वापर करून ते वाया न घालवण्याला सर्वाधिक महत्त्व दिले जाते आहे

डॉ. दीपक शिकारपूर

पाच जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. येत्या काळामध्ये एक वेगळ्या प्रकारची, नवनिर्मितीशी संलग्न असलेली, अर्थक्रांती (इनोव्हेटिव्ह इकॉनॉमी) होणार आहे. म्हणजेच शेती, पर्यावरण व व्यावसायिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांवर मात करण्याचे अभिनव मार्ग आपल्याला शोधावे लागणार आहेत. तंत्रज्ञान आणि पर्यावरणाची सांगड घालून पारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर कमीतकमी कसा करता येईल, याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल़ कारण या ऊर्जास्रोतांचे साठे कमी होत आहेत. सर्वच देशांमध्ये पर्यावरणपूरक चळवळी जोर धरू लागल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा विचार करून या क्षेत्रात नवनव्या संशोधनांना दिशा मिळते आहे. त्यानुसार बदल होत आहेत.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये या नवविचाराला ‘ग्रीन आयटी’ उर्फ‘हरित-माहिती तंत्रज्ञान’ असे नाव पडले आहे. यामध्ये ऊर्जास्रोतांचा कार्यक्षमतेने व पुरेपूर वापर करून ते वाया न घालवण्याला सर्वाधिक महत्त्व दिले जाते आहे. ग्रीन आयटीचे दूरगामी फायदे आहेत.निसर्गाची जपणूक, ई-कचºयाचे प्रमाण घटवणे, जुन्या उपकरणांची कार्यक्षमतेने विल्हेवाट लावणे, उत्पादनाच्या वेळीच संभाव्य धोके ओळखणे व ते कमी करणे, वस्तूंचा पुनर्वापर, आवश्यक तेवढेच प्रिंटआउट्स काढणे, आभासी पद्धतीने कामे करणे (व्हर्च्युअल वर्किंग), प्रदूषण-नियंत्रण, संसाधने व स्रोतांचा पूर्वनिश्चित मार्गाने वापर, ऊर्जा कार्यक्षमता अशा अनेक मुद्द्यांची अंमलबजावणी या क्षेत्रात केली जात आहे.

वीजनिर्मिती करण्याचे अपारंपरिक मार्ग आता तसे पाहिले तर रु ळले आहेत. सौरऊर्जा हा त्यापैकी एक रूळत असलेला आणि सर्वांपर्यंत पोहोचलेला मार्ग. बºयाच इमारतींच्या छपरांवर हल्ली सोलर पॅनेल्स बसवलेली दिसतात. तिचा वापरही वाढतो आहे. सौरऊर्जा-निर्मितीची व्याप्ती खूपच वाढवणारे एक संशोधन स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी केले आहे. त्यामुळे सोलर पॅनेलचे रूपांतर चक्क स्टिकरमध्ये झाले आहे! सूर्यकिरणांवर प्रक्रिया करणारे सोलर सेल्स आता कोठेही चिकटवण्याजोग्या पातळ रूपात उपलब्ध होत आहेत. म्हणजेच जवळजवळ कोणत्याही पृष्ठभागावर ते चिकटवून सौरऊर्जा मिळवता येईल!

बदलत्या तंत्रज्ञानानुसार (आणि तंत्रज्ञानामुळेदेखील) गेल्या दोन दशकांत बॅटऱ्यांची अंतर्रचना खूपच बदलली आहे. बॅटºयांच्या तीन मुख्य मर्यादा उघड झाल्या होत्या. वजन, आकार आणि ‘डेड’ बॅटरीमुळे होणारे पर्यावरणाचे प्रदूषण. पूर्वी बॅटरीच्या बांधणीमध्ये लेड म्हणजे शिशाचा मुबलक वापर असायचा. त्याच्या पर्यावरणीय मर्यादा स्पष्ट झाल्यावर लिथिअम-आयनपासून बनवलेल्या बॅटरी-इलेक्ट्रोड्सचा जमाना आला. परंतु आता यालादेखील जैविक स्वरूपाचा पर्याय शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे असे दिसते. विषारी पदार्थांचा वापर नसलेल्या आणि शाश्वत स्वरूपाची रचना असलेल्या या बॅटºयांमध्ये चक्क ‘रूबिया पेरेग्रिना’(madder) या जंगली वनस्पतीच्या मुळांपासून काढलेल्या रंगद्रव्याचा उपयोग केला जातो.

सर्व नैसर्गिक संसाधने व स्रोतांचा काटकसरीने वापर करून आपण ते पुढील पिढ्यांसाठी जतन केले पाहिजेत. म्हणजे त्यांनाही दर्जेदार जीवनशैलीचा आणि ग्रीन आयटीमुळे सुरक्षित राहिलेल्या पर्यावरणाचा फायदा मिळेल. ई-कचरा गोळा करणे, त्यामधील पुनर्वापरायोग्य भाग काढून घेणे व उरलेल्याची विल्हेवाट लावण्याबाबत नवीन धोरणांची चौकट तयार करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर माहिती (डेटा), सिस्टिम, व्यवहार, सेवासुविधा इ. वापरताना प्रत्येक व्यक्तीने संबंधित कार्यपद्धतींमध्ये आणि खुद्द स्वत:मध्येही योग्य ते बदल करून, या नव्या हरित क्रांतीला हातभार लावणे गरजेचे आहे, हाच या बदलांचा आणि नव्याने होत असलेल्या संशोधनांचा संदेश आहे.पर्यावरणावरील ताण कमी करण्यासाठी व पर्यावरण व्यवस्थापनासाठी ISO-14000 आणि ऑक्युपेशनल हेल्थ अ‍ॅण्ड सेफ्टी स्टॅण्डर्ड्स (ohsas-18001) सारख्या नवीन आंतरराष्ट्रीय मानकांची योग्य अंमलबजावणी त्वरेने व्हायला हवी. या मानकांनी माहिती तंत्रज्ञानासंबंधीच्या जोखमी तसेच त्यांवरील प्रतिबंधात्मक उपायांबाबत मार्गदर्शन केले आहे. रोजच्या वापरातील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांना ही मानके लागू आहेत. तसेच यामुळे ग्रीन आयटी पद्धतींचा वापर करून प्रत्येक जण ग्रीन आयटीचा पुरस्कर्ता बनू शकतो व सामाजिक मनोवृत्तीत बदल घडवून पर्यावरण जास्त संतुलित आणि सुरक्षित बनवू शकतो.

(लेखक संगणक साक्षरता प्रसारक आहेत)

टॅग्स :environmentवातावरणtechnologyतंत्रज्ञान