शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

मोठा भाऊ हरपल्याचे दुःख, फक्त सहकारी नव्हे, निकट मित्रही असलेल्या दादांचा मृत्यू सुन्न करणारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 08:32 IST

Ajit Pawar: माझ्यापेक्षा दादा अनुभवाने आणि वयानेही मोठेच, मात्र सरकारमध्ये एकत्र काम करताना आम्ही मित्रासारखे हसत-खेळत काम केले. फक्त सहकारी नव्हे, निकट मित्रही असलेल्या दादांच्या अपघाती निधनाने माझा मोठा भाऊ गेल्याची वेदना माझ्या वाट्याला आली आहे. 

एकनाथ शिंदे(उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र)

माझ्यापेक्षा दादा अनुभवाने आणि वयानेही मोठेच, मात्र सरकारमध्ये एकत्र काम करताना आम्ही मित्रासारखे हसत-खेळत काम केले. फक्त सहकारी नव्हे, निकट मित्रही असलेल्या दादांच्या अपघाती निधनाने माझा मोठा भाऊ गेल्याची वेदना माझ्या वाट्याला आली आहे.

वेळ पाळणे, शिस्तबद्धता आणि प्रशासकीय कौशल्य ही अजितदादांची खरी ओळख. चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत ते जसे होते, तसेच अगदी शेवटपर्यंत राहिले. स्पष्टवक्तेपणामुळे ते फटकळ वाटायचे; पण हे स्पष्ट बोलणे आपल्या फायद्याचे आहे हे जेव्हा समोरच्याला कळायचे तेव्हा त्यालाही दादांविषयी आदर वाटायचा.

देवेंद्रजी दिवसभर काम करतात, दादा सकाळी, पहाटेपासून कामाला सुरुवात करत आणि माझे काम दुपारनंतर सुरू होते. आम्ही तिघांनी वेळेचे वाटप करून घेतले आहे, असे मी गमतीने म्हणत असे. पण दादांच्या दिवसाची सुरुवात कितीतरी वेळा पहाटे ५ आणि ६ वाजता झालेली आहे. कोविड काळात तर ते स्वतः दररोज मंत्रालयात नियंत्रण कक्षात उपस्थित असायचे. अजितदादा खऱ्या अर्थाने अजातशत्रू होते. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी असो किंवा विरोधी असो, सगळ्यांचे ते मित्र होते. राजकीय टीका-टिपण्या चालू असतातच, पण त्यांच्याविषयी कोणी मनात वैर बाळगले नाही. दूरदर्शी, स्पष्टवक्ता आणि अतिशय अभ्यासू नेता म्हणून ते कायम माझ्या लक्षात राहतील.

सहा वेळा दादा उपमुख्यमंत्री होते, त्यापूर्वी मंत्रीही होते. ‘सर्वाधिक काळ विधानभवनात बजेट सादर करणारा’ म्हणून गौरवाने स्वतःचा उल्लेख करायचे. पण त्यांच्या वागण्या-बोलण्यात अहंकार नव्हता. त्यांच्या कामाचा झपाटा आणि निर्णयक्षमता आम्ही सगळ्यांनी अनुभवली आहे. वित्तमंत्री म्हणून त्यांच्याकडे सगळ्याच खात्यांबाबत माहिती असायची, पण म्हणून त्यांनी कधी शिष्टाचाराची चौकट मोडली नाही. धोरणात्मक निर्णय जाहीर करतानाही त्यांनी कधी कुणाला अव्हेरल्याचे दिसत नाही. आपले म्हणणे ते सुस्पष्टपणे आणि अधिकारवाणीने मांडत.

राज्याची आर्थिक घडी चांगली बसावी यासाठी राज्याचा वित्तमंत्री म्हणून अजितदादांनी विकासकामांना खीळ बसू न देता अतिशय हातोटीने अनेक निर्णय घेतले. स्वप्नाळू सादरीकरण आणि सांगोवांगी गोष्टींपेक्षा व्यावहारिक गोष्टी ते  कायम पडताळून पाहात. एखादी संकल्पना पुढे आली, की तिचा  सर्व बाजूंनी विचार करायला भाग पाडत. ती संकल्पना कितपत टिकेल, तिच्या भविष्यातील देखभालीची व्यवस्था इथपासून, ती लोकहिताची आहे का, किती जणांसाठी ती उपयुक्त ठरणार आहे, अशा अनेक गोष्टींचा ते विचार करत. ठोस आणि तडकपणे निर्णय घेत असल्याने विधिमंडळातील आमदार आणि मंत्रिमंडळातील होतकरू-तरुण मंत्र्यांनाही अजितदादांच्या कार्यशैलीबाबत, दैनंदिनीबाबत कुतूहल असे. ज्येष्ठत्वाच्या नात्याने त्यांनाही वेळप्रसंगी ठणकावयाला दादा मागेपुढे पाहत नसत.

अवघे राज्य त्यांना दादा म्हणून ओळखते, हा खरेच ‘दादा’ माणूस होता ! आता अजितदादा आपल्यात नाहीत, दिसणारही नाहीत ही कल्पनासुद्धा मनाला पटत नाही. मी शिवसेनेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Brother's loss: Ajit Dada's death, a close friend, shocking!

Web Summary : Eknath Shinde mourns Ajit Dada's sudden demise, recalling their close friendship and Dada's administrative skills, punctuality, and dedication. He highlights Dada's straightforwardness, work ethic, and his ability to connect with everyone, regardless of political affiliation. Shinde fondly remembers Dada's contributions as Finance Minister and his commitment to public welfare.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाBaramatiबारामतीMahayutiमहायुतीEknath Shindeएकनाथ शिंदे