शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा गनिमी कावा?

By admin | Updated: December 20, 2015 22:25 IST

शिवसेनेत असताना छगन चन्द्रकान्त भुजबळ यांना जे बाळकडू मिळाले त्याचा वापर तिथे असेपर्यंत तर झालाच पण नंतरही झाला आणि आजही तो होतो आहे असे दिसते. गनिमी कावा हे त्या बाळकडूतलेच एक अस्त्र

शिवसेनेत असताना छगन चन्द्रकान्त भुजबळ यांना जे बाळकडू मिळाले त्याचा वापर तिथे असेपर्यंत तर झालाच पण नंतरही झाला आणि आजही तो होतो आहे असे दिसते. गनिमी कावा हे त्या बाळकडूतलेच एक अस्त्र. त्याचा वापर करून वेषांतरासह भुजबळांनी महाराष्ट्र-कर्नाटक यांच्या सीमेवरील वादग्रस्त विभागात बंदी मोडून कसा प्रवेश केला त्याची रंजक कहाणी आजही ते मोठ्या चवीने सांगतात. पण आता त्यांच्याकडे सांगण्यासाठी आणखी एक कहाणी उपलब्ध झाली आहे. राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या उभारणीत भुजबळांनी प्रचंड मोठी अनियमितता केली असा फडणवीस सरकारचा आरोप होता आणि या आरोपाची चौकशी करण्याची खास अनुमती त्यांनी लाचलुचपत प्रतिबंध खात्याला दिली होती. या खात्याने राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या प्रकरणाशी संबंधित अहवालाची मागणी केली आणि आता तो अहवाल लाचलुचपतवाल्यांकडे पोचता झाला असून, त्यात भुजबळांना म्हणे संपूर्ण स्वच्छतेचे प्रमाणपत्र बहाल केले गेले आहे. हा भुजबळांचा गनिमी कावा म्हणावे? निश्चितच म्हणता येईल. कारण गनिमी काव्यात केवळ एकजण कावेबाज असून चालत नाही, तर समोरचा बावळट असावा लागतो. इथे तेच झालेले दिसते. ‘साबां’तील एका उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याने परस्पर भुजबळांचे ‘चारित्र्य प्रमाणपत्र’ लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे पाठवून दिले पण ना त्याच्या सचिवाला, ना मंत्र्याला आणि ना मुख्यमंत्र्याला त्याची खबर लागली. म्हणजे भुजबळ हे भ्रष्टाचार शिरोमणी आहेत असे सांगून त्यांच्या भ्रष्टाचाराचा डोंगर पोखरणाऱ्या फडणवीस सरकारच्या हाती साधा उंदीरही लागला नाही. नोकरशाही अत्यंत तरबेज असते असे सार्थपणे म्हणले जाते. ती लोकनियुक्त सरकारचे पाणी तत्काळ जोखत असते. फडणवीस सरकारचे पाणीही तिने जोखले असल्याने हे सरकार येताजाता तिच्या नावाने खडे फोडत असते. त्यातच मग नोकरशाही आजही आधीच्या आघाडी सरकारला अनुकूल असल्याचे मुख्यमंत्री स्वत:च म्हणाले होते. घ्या म्हणावे आता त्याची प्रत्यक्ष प्रचिती!