शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

अनोळखी माणसांशी संवाद अन् घरात वाद; सोशल मीडियाचा असाही साईड इफेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 16:21 IST

वाद कोणताही असो, संवादानेच त्यावर तोडगा निघतो.

- विनायक पात्रुडकर

वाद कोणताही असो, संवादानेच त्यावर तोडगा निघतो. हाणामारी करून, एकमेकांवर आरोप करून किंवा एकमेकांचा बळी घेऊन प्रश्न कधीच सुटत नाही. विवाह तुटू नये म्हणूनदेखील पती-पत्नींला संवाद साधण्याचा सल्ला देतात. अपुऱ्या संवादामुळे विवाह टिकत नाही. अगदी एकमेकांचा जीव घेण्याचे धाडस केले जाते. असेच एक प्रकरण नुकतेच मुंबईत घडले आहे. पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होता. हा वाद इतका विकोपाला गेला की पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. पत्नीची हत्या केल्यानंतर पती स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन शरण झाला. आमच्यात वाद झाला. त्यानंतर मी झोपलो. पण पत्नी सोशल मिडियावर व्यस्त होती. त्यामुळे मी तिची हत्या केली, असे पतीने पोलिसांना सांगितले. 

सोशल मिडियामुळे अभिव्यक्ति स्वातंत्र्याला मोकळीक मिळली आहे. आपल्याकडे कुटुंब सदस्यांशी बोलायला वेळ नसतो. पण सोशल मिडियावर आपण सतत अ‍ॅक्टिव असतो. आपला आपल्याच माणसांसोबतच संवाद संपत चालला आहे. आपण अनोळखी माणसे जोडतो, पण रक्ताची नाती सहज लांब करतो. त्यातूनच असे प्रकार घडतात. अपुऱ्या संवादाचा बळी केवळ पती-पत्नीतच घेतला जातो असे नाही. भाऊ, बहीण, आई, वडील, मुलगा, मुलगी, मित्र, अशा जीवनातील प्रत्येक नात्यात अशा संवादाचा बळी जात असतो. त्यात प्रत्येक वेळी माणूस संपवला जातो, असे काही नाही. वर्षानुवर्षे एकमेकांशी न बोलणे, बघून पण तोंड फिरवणे, एकमेकांवर टीका करणे, हे सर्व प्रकार नाती संपवण्याचाच एक भाग आहेत. त्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर तरी त्यातून आपण बोध घ्यायला हवा. ही घटना का घडली, त्यामागचा हेतू काय होता, या सर्वाचा पोलीस तपास करतीलच. पण प्राथमिक कारण तर पती-पत्नीमधील वाद हेच आहे.

वाद का होतात? त्याची कारणे काय? याचा तरी विचार आपण करायला हवा. कोणी तरी माघार घ्यायला हवी. माघार घेतल्याने प्रश्न सुटू शकतो. पण मग आत्मसन्मानाचा मुद्दा येतो. हे सर्व बाजूला ठेवून नाते टिकवणे, हा एकमेव उद्देश ठेवला तर नक्कीच वाद होणार नाहीत. सरतेशेवटी सुखी आयुष्याचे सूत्र वादामध्ये कधीच सापडणार नाही. तेव्हा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव राहण्यापेक्षा आपण नात्यांमध्ये प्रत्यक्ष अ‍ॅक्टिव राहिला, तर नक्कीच आयुष्य सुखी होईल. अन्यथा माणूस संपवायला वेळ लागत नाही. मात्र त्याचा पश्चाताप आयुष्यभराचा असतो. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाrelationshipरिलेशनशिप