शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पब्लिसिटीची धांदल, ब्रेनवॉशिंगचा भडिमार, पण प्रबोधनाचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 04:44 IST

माहितीचा पूर प्रचंड, पण योग्य माहितीचा अभावही! त्यावरील उत्तर त्रागा करणे, हताश होण्यात नसून प्रबोधनाच्या अभिनव कल्पना शोधण्यात आहे.

अमृत बंग, सहसंचालक, ‘सर्च’ ‘निर्माण’ या युवा उपक्रमाचे प्रमुख

महाराष्ट्राला सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींचा एक उत्तुंग वारसा आहे. समाजशास्त्रज्ञ मिलिंद बोकील मांडतात त्या प्रकारे याच्या किमान तीन मुख्य धारा आहेत. एक, महादेव गोविंद रानडे प्रणीत मंडळीकरण अथवा संस्थात्मक काम उभे करणे आणि त्याद्वारे सामाजिक सेवेचे वा इतर उपक्रम करणे. दोन, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांची विद्रोहाची परंपरा. आणि तीन, गोपाळ गणेश आगरकर, रघुनाथ धोंडो कर्वे यांची प्रबोधनाची, समाजात विवेकवादी विचार पसरवण्याची परंपरा. माझ्या मते आपल्याकडे एक चौथी धारादेखील आहे – ज्यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधन यांचा समाजातले प्रश्न अभ्यासण्यासाठी आणि त्यावर उत्तरे शोधण्यासाठी उपयोग करण्यात आलाय. मात्र त्याविषयी नंतर कधीतरी. 

गेल्या काही दशकांमध्ये होत असलेले सामाजिक कार्याचे बदलते स्वरूप बघता वरीलपैकी तिसरी परंपरा जरा अशक्त झाल्यासारखी दिसते. लोकांना विचार करायला प्रवृत्त करणे, सत्य – असत्य याची शहानिशा करणे, तथ्यांवर आधारित मांडणी व मुद्द्यांचा स्वीकार करणे, प्रश्न विचारणे तसेच प्रश्न विचारायला उद्युक्त करणे, जिज्ञासा व खुलेपणा यावर आधारित विचार प्रक्रिया घडविणे, इ. विविध पद्धतींनी समाजाला अधिक विवेकी व शहाणे करून सोडणे हे अत्यंत महत्त्वाचे काम जरा मागे पडले आहे. आपल्या अवतीभवती असलेला बाबा-बुवांचा सुळसुळाट, विविध सणांच्या आक्रमक उत्सवाचे वाढते स्तोम, आणि जीवनाच्या विविध अंगांमध्ये पसरलेली अवैज्ञानिकता हे बहुधा याचेच परिणाम आहेत. सोशल मीडिया व मार्केटिंगद्वारे प्रचाराचा भडिमार तर मोठ्या प्रमाणात होतो पण त्याचा उद्देश बऱ्याचदा ‘पब्लिसिटी’ वा ‘ब्रेनवॉशिंग’ असतो, प्रबोधन नाही.

या पार्श्वभूमीवर ‘निर्माण क्विझ’ हा एक वेगळा उपक्रम गडचिरोलीतल्या तरुणांसाठी आम्ही करून बघितला. गडचिरोली जिल्ह्यासमोरील महत्त्वाची आव्हाने, जिल्ह्यातील काही उत्तम सामाजिक कामे व कार्यरत युवा, जिल्ह्याच्या आजवरच्या इतिहासातील काही उत्तुंग बाबी (गडचिरोली म्हणजे निव्वळ मागास असे नाही हे कळण्यासाठी) आणि युवांच्या विकासासाठीचे काही महत्त्वाचे मुद्दे अशांवर आधारित २५ प्रश्न आम्ही काढले. गेल्या दोन वर्षात गडचिरोलीतील ७३ वेगवेगळ्या शाळा, कॉलेजेसमधील एकूण ६७०६ विद्यार्थ्यांसोबत आम्ही ही प्रश्नमंजूषा घेतली. 

निव्वळ माहिती देण्याऐवजी  प्रश्न विचारून कुतूहल निर्माण करणे व मग एका आकर्षक पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे उत्तरे समजावून सांगणे, गंमत यावी आणि लक्ष टिकून राहावे म्हणून स्पर्धात्मक खेळ करणे, मुला-मुलींनी एकमेकांची उत्तरे तपासणे व गुण देणे, आणि शेवटी पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देणे असे या उपक्रमाचे स्वरुप होते. उपदेश देण्याऐवजी उत्सुकता पैदा करण्यावर भर होता. आजकाल अनेक ठिकाणी शिक्षकांकडून ‘मुले लक्ष देत नाहीत’ अशी तक्रार ऐकण्यास मिळते. 

आम्हाला मात्र या ‘गेमिफाईड एज्युकेटिव्ह क्विझ’ला तरुणांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. ६१% युवांना एकूण गुणांपैकी ४०%हून कमी गुण  आणि केवळ २% युवांना ८०%हून अधिक गुण मिळाले यावरून सध्या असलेला योग्य माहितीचा प्रचंड अभावदेखील दिसला. मात्र त्यावरील उत्तर त्रागा करण्यात, हताश होण्यात नसून प्रबोधनाच्या अभिनव कल्पना शोधण्यात व अंमलात आणण्यात आहे हे देखील जाणवले.    amrutabang@gmail.com

 

English
हिंदी सारांश
Web Title : Publicity blitz, brainwashing rampant, but what about true enlightenment?

Web Summary : Amrut Bang highlights the decline of rational discourse amidst publicity. 'Nirman Quiz' in Gadchiroli sparked curiosity among youth, revealing information gaps. Innovative enlightenment is key.
टॅग्स :SocialसामाजिकSocial Mediaसोशल मीडिया