शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील रहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 22:55 IST

जिल्हा परिषद निवडणूक । राष्ट्रवादीच्या बैठकीत किरण शिंदे यांचे आवाहन

साक्री : विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून शरद पवार यांच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलेला आहे़ आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी जास्तीत जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पाडून घेण्यासाठी आणि त्या जागा निवडून आणण्यासाठी पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील रहावे असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांनी साक्रीतील बैठकीत आवाहन केले़ आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली़ या बैठकीस माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, प्रांतिक सदस्य सुरेश सोनवणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले, साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जितेंद्र मराठे, सरचिटणीस प्रा़ नरेंद्र तोरवणे, जितेंद्र बिरारीस, साक्री विधानसभा क्षेत्र प्रमुख विलास देसले, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, साक्री तालुका राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती देसले, करीम शहा यांच्यासह अन्य पदाधिकारी, माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ शिंदे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपली ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे़ सर्वांनी एकत्र येऊन जास्तीच्या जागा मिळविण्यासाठी प्रयत्नशील असावे़ तालुका अध्यक्ष जितेंद्र मराठे म्हणाले, मागील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा इतिहास बघितला तर साक्री तालुक्यातून जास्तीत जास्त जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडून दिलेले आहेत़ जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष पदासह सभापती पदेही भूषविलेले आहेत़ साक्री तालुका पंचायत समितीमध्ये एकदा एक हाती सत्ता प्रस्थापित केली तर दुसºयांदा आघाडी धर्म पाळून काँग्रेसच्या बरोबरीने उपसभापती पद भूषविलेले आहे़प्रदेश पातळीवरील निर्णय मान्य करावाआघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवाव्यात किंवा कसे याबाबत प्रदेश आणि जिल्हा पातळीवरुन जो निर्णय होईल तो सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल़ परंतु जागा वाटप करत असताना साक्री तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किमान ११ जिल्हा परिषदेचे गट आणि २२ पंचायत समितीच्या गणांमध्ये तिकीटे मिळावेत, या सर्व जागा निवडून आणण्याकरता जिल्ह्यातील आणि तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्न करतील, असे ठरविण्यात आले़पक्षातून गेलेल्यांना यापुढे कधीही थारा नाहीएक दोन जागा कमी मिळाल्या तरी चालतील परंतु अडचणीच्या काळात पवार साहेबांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून गेलेल्या लोकांना पक्षांमध्ये पुन्हा थारा देण्यात येणार नाही, असेही किरण शिंदे यांनी आर्वजून सांगितले़ या बैठकीमध्ये तालुक्यातून विविध भागातून आलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी निसंकोचपणे आपली मते  व्यक्त केलीत़ शरद पवार यांच्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आपली निष्ठा असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या़ शुक्रवारी सायंकाळी सुरु झालेली ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरु होती़ 

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक