शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

बळसाणेसह परिसरात मजुरांचा भासतोय तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 23:00 IST

माळमाथाचा शेतकरी आला पुर्णत: मेताकुटीला । कापूस भुईला तरीही मजूर मिळेना, अशी दयनीय अवस्था

बळसाणे : अतिवृष्टीच्या तडाख्यात हातातोंडाशी आलेले पीक भुईसपाट झाले़ सध्याच्या परिस्थितीत हाताशी आलेल्या कापूस वेचणीसाठी प्रति किलो दहा ते बारा रुपये मजुरी देऊनही मजुरांचा शोध घेण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे़ फुटलेल्या कपाशी वेचायला मंजुर मिळत नसल्याने कापूस जमिनीवर टेकू लागला आहे़ यामुळे बळसाणेसह माळमाथा भागाचा शेतकरी पुर्णत: मेटाकुटीला आलेला आहे़बळसाणे व माळमाथा परिसरातील मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड झालेली आहे़ जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने बियाणे, खते, फवारणी, मजुरीसह मशागत यांच्यासह आदींचा खर्च वाया जाईल की काय अशी अवस्था झाली होती़ परतीच्या पावसाने शेतात पाणी साचल्याने हातातोंडाशी आलेली पीक मातीमोल झाले़पानगळ होऊन कपाशीची बोंडे काळी पडली तर बाजरी भुईसकट झाली़ कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला़ या पीकांसह शेतातील भाजीपाला, मका आदी पिकांचे पुर्णपणे नायनाट झाल्याचे दिसून येत आहे़ वेचणीला आलेला कापूस शेतात साचलेल्या डबक्यामुळे व ओलसर जमिन असल्याने वेचता येईना़ या पेचात शेतकरी हिरावून गेला आहे़ मात्र, मागील आठवडा भरापासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतातील कापूस वेचणीसाठी शेतकºयांची धावपळ सुरु झाली आहे़ कापूस वेचणीसाठी मजुरांना वाढीव पैसे तसेच जाण्या-येण्यासाठी वाहने देऊन     मजुरांची सरबत्ती असल्याचे चित्र बळसाणे व माळमाथा भागात पहावयास मिळत आहे़ नुकतीच शाळा सुरु झाल्याने लहान मुलांनी ही शेताकडे पाठ     फिरावल्याचे दिसून येत आहे़ आजही मजुरांची चणचण या भागात निर्माण झाली आहे़ बाहेरुन मजुरांचा ताफा येत आहे़ शेतात फुटलेला कापूस जमिनीला टेकू लागला आहे व बहुतेक ठिकाणी रात्री बे रात्री कापूस चोरीला जात असल्याच्याही घटना घडत आहेत़ माळमाथा परिसरात बहुतांश ठिकाणच्या जमिनीत ओलसर असल्याने मजुर कामाला स्पष्टपणे नकार देत आहे़ थंडीचे प्रमाण तसे कमी असल्याने रब्बीच्या पेरण्या देखील या भागात खोळंबल्या आहेत़ पण, जेवढा कापूस हातात लागेल तेवढे घेण्याच्या मागे शेतकरी व मजूर अडकला आहे़ कापूस पीक अत्यंत कमी आल्याचे शेतकºयांनी सांगितले़ 

टॅग्स :Dhuleधुळे