शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचेच पगार उशिरा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:35 IST

शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार १ तारखेपूर्वीच होत असतात, तसेच जिल्हा परिषद शिक्षकांचे पगारही ५ तारखेपूर्वीच करण्याचे आदेश आहेत; मात्र पगाराची ...

शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार १ तारखेपूर्वीच होत असतात, तसेच जिल्हा परिषद शिक्षकांचे पगारही ५ तारखेपूर्वीच करण्याचे आदेश आहेत; मात्र पगाराची तारीख उलटून आठ-दहा दिवस होतात, तरी पगार हातात येत नसल्याने, भरमसाठ पगार असूनही शिक्षकांचे पगाराअभावी आर्थिक नियोजन कोलमडत असते.

अनेकांना घर, गाडी अथवा तत्सम कारणांसाठी कर्ज घेतलेले असते, तसेच बहुतेक शिक्षकांच्या विमा पॅालिसी असतात. मुलांच्या उच्च शिक्षणाचा खर्च असतो. यासाठी पैशांची नितांत गरज असते.

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या पगारासाठी पगाराचा आराखडा तयार करून तशी मागणी करावी लागत असते. मागणी वेळेवर केली तरच अनुदान मिळत असते; मात्र बीडीएसच वेळेवर तयार होत नसल्याने, पाच तारखेला होणारा पगार १५ ते २० तारखेच्या दरम्यान होत असतो. यामुळे आर्थिक नियोजन कोलमडते आहे. काही शिक्षकांचे विविध बँकांचे हप्ते थकलेले आहेत. हप्ते थकल्याने, त्यावरील व्याज वाढते? याला जबाबदार कोण, असा प्रश्न शिक्षकांतर्फे उपस्थित होऊ लागला आहे.

कोरोनाकाळात इतर विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच शिक्षकांचेही भरीव योगदान आहे. त्यांनी आतापर्यंत शासनाच्या सर्व आदेशांचे पालन केले आहे. त्यामुळे इतर विभागाचे पगार ज्याप्रमाणे ठरलेल्या तारखेलाच होतात, तसेच शिक्षकांचे पगारही दर महिन्याच्या ठरलेल्या तारखेच्या दिवशीच व्हावे, अशी रास्त अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केलेली आहे.

अनियमित पगार

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना समाधानकारक पगार आहेत. साधारत: दर महिन्याच्या पाच तारखेला त्यांचे पगार होत असतात. यानुसारच शिक्षक आपले नियोजन करीत असतात; मात्र गेल्या काही महिन्यांपासून पगार अनियमित होत असल्याने, त्यांचेही आर्थिक नियोजन कोलमडलेले दिसते.

पगार उशिरा होत असल्याने, गृहकर्ज, विम्याचे हप्ते थकतात. जीआयएस कर्ज वेळेवर भरले नाही तर चक्रवाढ व्याज भरावे लागते. यासाठी पगार वेळेवर होणे गरजेचे आहे. यापुढे पगाराला उशीर झाल्यास शिक्षक समिती आंदोलन करेल.

- राजेंद्र पाटील,

शिक्षक,

संपूर्ण राज्यात बीडीएस बंद केल्यामुळे पगाराला उशीर होत आहे. पगार हा एक तारखेलाच झाला पाहिजे. पगार उशिरा होत असल्याने, विविध हप्ते भरण्यात अडचणी येत असतात. शिक्षकांचे पगार वेळेतच झाले पाहिजे.

- बापू पारधी,

शिक्षक.

काही महिन्यांपासून शिक्षकांचा पगार अनियमित होत आहे. त्यामुळे बँकांचे हप्ते वेळेवर भरता येत नाहीत. पगार वेळेवर नसल्याने, घरगुती आर्थिक नियोजनही कोलमडते. कोरोना काळात उपचारासाठी पैशांची नितांत गरज आहे.

- भूपेश वाघ,

शिक्षक.

जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार नियमित व दर महिन्याच्या पाच तारखेलाच होत असतात. शिक्षकांचे पगार उशिराने होत नाहीत.

- मनीष पवार,

शिक्षणाधिकारी, प्राथमिक, धुळे.