शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

व्हीलचेअर नावालाच, दिव्यांगासह ज्येष्ठांची बसस्थानकात कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 16:01 IST

धुळे : बसस्थानकात व्हीलचेअर नावालाच असल्याचे चित्र आहे. बसस्थानकातील नियंत्रणात कक्षात व्हीलचेअर उपलब्ध आहे. मात्र, त्याबाबत दिव्यांग व जेष्ठ ...

धुळे : बसस्थानकात व्हीलचेअर नावालाच असल्याचे चित्र आहे. बसस्थानकातील नियंत्रणात कक्षात व्हीलचेअर उपलब्ध आहे. मात्र, त्याबाबत दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना माहितीच नसल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळले.बसस्थानकात दिवसभर प्रवाशांची वर्दळ असते. ६००पेक्षा अधिक बसेस बसस्थानकावर ये - जा करतात. धुळे शहरातून महत्त्वाचे दोन महामार्ग जातात. तसेच दोन राज्यांच्या सीमा जिल्ह्याला लागलेल्या आहेत. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने जिल्ह्याचे महत्त्वाचे स्थान आहे. येथील बसस्थानकातून इतर राज्यात जाणाऱ्या बसेसची संख्याही मोठी आहे. तसेच येथून इतर शहरात दररोज ये - जा करणाऱ्या प्रवाशांची संख्यादेखील लक्षणीय आहे. त्यात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. बसस्थानकात रॅम्प उभारण्यात आला आहे. त्याचा दिव्यांग बांधवांना उपयोग होत आहे. तसेच रोटरी क्लबकडून व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आली आहे.स्थानकातील नियंत्रण कक्षात व्हीलचेअर ठेवण्यात आली आहे. दिव्यांग प्रवाशांनी मागणी केली तर व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येते.व्हीलचेअर नियंत्रण कक्षातबसस्थानकात व्हीलचेअर उपलब्ध आहे. दिव्यांग प्रवाशांना त्याबाबत माहिती नाही. नियंत्रण कक्षात व्हीलचेअर ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. व्हीलचेअर असूनही दिव्यांग बांधवांना त्रास सहन करावा लागत आहे. व्हीलचेअर उपलब्ध असल्याबाबत माहिती देणे गरजेचे आहे.