मिल परिसरात लसीकरणाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:35 IST2021-04-06T04:35:11+5:302021-04-06T04:35:11+5:30

यावेळी स्थायी समिती सभापती संजय जाधव, उपायुक्त गणेश गिरी, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, नगरसेवक कमलेश देवरे, प्रशांत बागुल, ...

Vaccination begins in the mill area | मिल परिसरात लसीकरणाला सुरुवात

मिल परिसरात लसीकरणाला सुरुवात

यावेळी स्थायी समिती सभापती संजय जाधव, उपायुक्त गणेश गिरी, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, नगरसेवक कमलेश देवरे, प्रशांत बागुल, गुलशन उदासी, किशोर सरगर, अशोक वराडे, विजय मराठे, सुनील चौधरी, तसेच भाजपा पदाधिकारी प्रदीप पानपाटील, मनोज शिरुडे, दिग्विजय गाळणकर, गणेश दशपुते, प्रदीप काळे, महेश थोरात, सुनील पाटील, सुरेश जाधव, भगवान मासुळे, सुनील बडगुजर, वामन मोहिते, तसेच द्वारकाधीश प्रतिष्ठानचे सदस्य अमोल पुकळे, भय्या पाटील, मुकेश थोरात, नितीन आखाडे, मनोज सरगर, किरण डोमाळे, महेश चंदनकर, चिटू निंबाळकर, गोविंदा सोनवणे, कल्पेश सोनवणे आदी उपस्थित होते.

मिल परिसरातील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करावे, यासाठी नगरसेवक मासुळे यांनी मनपा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. लसीकरण सुविधा डॉ. राजेश अग्रवाल यांच्या क्लिनिकमध्ये करण्यात आली आहे.

मिल परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरीक, महिला, पुरुष तसेच ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांनी दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत कोरोना लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. अग्रवाल यांच्या दवाखान्यात कोरोना लसीकरणासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध तसेच प्रशिक्षित नर्सची व्यवस्था करून दिली आहे. आपले दैनंदिन रुग्णसेवेचे काम सांभाळून लसीकरणासाठी मदत दिली आहे. त्याबद्दल नगरसेवक अमोल मासुळे यांनी डॉ. राजेश अग्रवाल यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Web Title: Vaccination begins in the mill area