शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

विना परवाना बोगस बायो डिझेल पंपावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 22:19 IST

पंप सील करुन २५ लाखांचा मुद्देमाल केला जप्त, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरपूर - तालुक्यातील मुंबई - आग्रा महामार्गावर सांगवी पोलीस आणि पुरवठा विभागाने मिळालेल्या गुप्त माहिती अनुसार दहिवद गावाजवळ एका हॉटेलच्या मागे धाड टाकून विना परवाना सुरु असलेला बोगस बायो डिझेल पंप सील करुन सुमारे २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आणि चार जणांविरुद्ध सांगवी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.सांगवी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना या बोगस बायो डिझेल पंपासंदर्भात गुप्त माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी प्रभारी पुरवठा निरीक्षक मायानंद भामरे यांच्यासोबत दहिवद गाव शिवारात हॉटेल आईसाहेब याच्या पाठीमागे सुरु असलेल्या बोगस बायो डिझेल पंपावर बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास धाड   टाकली. याठिकाणी शासनाची कोणतीही परवानगी अगर लायसन्स नसतांना बायो डिझेलचा साठा करुन विक्री केली जात असल्याचे दिसून आले. या बोगस पंपावरुन २ लाख २६ हजार ८०० रुपये किंमतीचे ३ हजार १५० लिटर बायोडिझेल, २० हजार किंमतीचा पंप व साहित्य तसेच   दोन मालट्रक एम.एच.१८ बी आर ५४२० व एम.एच.१८ एफ १७३ व पिकअप गाडी क्रमांक एम.एच.०२ एक्स ए ५५७५ असा एकूण २५ लाख ४६ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चंद्रसिंग रजेसिंग राजपूत (३८) रा. दहिवद, रामजीभाई तामलीया रा. सुरत, प्रकाशसिंग अमरसिंग सोलंकी रा. सुरत, मोहनसिंग अजबसिंग  राजपूत रा.वरुळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी तहसीलदार आबा महाजन, डीवायएसपी अनिल माने यांनी भेट दिली.सदरची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पोसई नरेंद्र खैरनार, हेकॉ. लक्ष्मण गवळी, हेमंत पाटील, संजय देवरे, शामसिंग वळवी, पोलीस नाईक संजीव जाधव, अनारसिंग पवार, कॉन्स्टेबल योगेश दाभाडे, राजीव गिते, गोविंद कोळी, योगेश मोरे यांच्या पथकाने केली.