शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशातील आणखी दोन प्रकार उघडकीस, एका पीडितेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 01:19 IST

बलरामपूर जिल्ह्यात बलात्काराची घटना; दोन जणांना अटक

बलरामपूर : उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यामध्ये दलित मुलीवरील बलात्कार प्रकरणामुळे देशात संतापाचे वातावरण असतानाच त्याच राज्यातील बलरामपूर जिल्ह्यातील गैसारी गावातील २२ वर्षे वयाच्या बलात्कारपीडित मुलीचाही मृत्यू झाला आहे. हाथरस येथील व बलरामपूरची बलात्कारपीडित मुलगी एकाच दिवशी, मंगळवारी मरण पावल्या. बलात्काराच्या घटनेत त्या दोघी गंभीर जखमी झाल्या होत्या. या दोन्ही मुलींवर त्यांच्या जिल्ह्यात बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. बलरामपूर येथील बलात्कारप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी शाहिद व साहिल या दोघांना अटक केली.

बलरामपूर बलात्कारपीडितेच्या आईने सांगितले की, बलात्कार करणाऱ्यांनी मुलीचे पाय तोडले व मणक्याला गंभीर दुखापत केली. ती महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मंगळवारी गेली होती. तिथून परतताना तीन ते चार लोकांनी अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. बलरामपूर प्रकरणासंदर्भात त्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक देवरंजन वर्मा यांनी सांगितले की, बलात्कारपीडित मुलगी एका खासगी कंपनीत काम करते. ती घरी परतली तेव्हा अत्यंत घाबरलेली होती व तिच्या हातावर इंजेक्शन टोचण्यासाठी आवश्यक असलेला कॅन्यूला लावलेला होता. तिला रुग्णालयात नेले जात असताना ही मुलगी वाटेतच मरण पावली. या मुलीच्या मृतदेहाच्या शवचिकित्सेमध्ये तिचे पाय, मणक्याला काहीही दुखापत झालेली नाही, हे दिसून आले.आणखी दोन प्रकार उघडकीसच्उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे चांगली नोकरी मिळवून देतो, असे सांगून एका युवतीला फसविले व तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी फरार आहे. याच राज्यातील आझमगढ जिल्ह्यामधील एका गावात आठ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या शेजारी राहणाºया २० वर्षे वयाच्या मुलाने बलात्कार केल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस