तुषारभाई एमबीबीएस?

By Admin | Updated: March 23, 2017 00:10 IST2017-03-23T00:10:24+5:302017-03-23T00:10:24+5:30

नंदुरबार : तळोदा येथील डॉ.तुषार मिरगे या डॉक्टरावर कारवाई करण्यात आली. वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे कारण देत गुन्हा दाखल करण्यात आला.

Tusharbhai MBBS? | तुषारभाई एमबीबीएस?

तुषारभाई एमबीबीएस?


नंदुरबार : तळोदा येथील डॉ.तुषार मिरगे या डॉक्टरावर  कारवाई करण्यात आली. वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे कारण देत गुन्हा दाखल करण्यात आला.
तळोदा येथील कॉलेज रोडवर असलेल्या लक्ष्मीनारायण जनरल हॉस्पीटल आहे. या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वैद्यकीय पथकाने जावून चौकशी केली. त्यावेळी डॉक्टराकडे वैद्यकीय पदवी अथवा पदविका प्रमाणपत्र नव्हते. नोंदणी प्रमाणपत्र देखील आढळून आले नाही. डॉ.मिरगे यांनी मध्यप्रदेशातील सेंधवा येथील होमिओपॅथी मेडीकल कॉलेजचे प्रमाणपत्र सादर केले, परंतु त्याला मान्यता आहे किंवा कसे याचा तपास करण्यात येत आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रेखा विठ्ठल शिंदे यांनी फिर्याद दिल्याने डॉ.तुषार मिरगे यांच्याविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Tusharbhai MBBS?