शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

वेगवेगळ्या अपघातात महिलेसह तीन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:48 IST

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वरखेडी रोडाच्या उड्डाणपुलावर भरधाव टँकरने महिलेला चिरडले. तर दोघे जखमी झाले. गुरुवारी सकाळी १० वाजेच्या ...

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वरखेडी रोडाच्या उड्डाणपुलावर भरधाव टँकरने महिलेला चिरडले. तर दोघे जखमी झाले. गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास अपघाताची ही घटना घडली. याप्रकरणी टँकरचालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. रेखाबाई आनंद भिल (३५, वकवाड, ता. शिरपूर) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या पती आनंद सुरजसिंग भिल (४०) व मुलगा असे तीन जण एमएच १५ एचई ५८१२ क्रमांकाच्या दुचाकीने वकवाडे येथे आई-वडिलांना भेटण्यासाठी जात होते. त्यादरम्यान, सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या धुळे शहरातील वरखेडी उड्डाण पुलाच्या चढवर त्यांना मागून येणाऱ्या टँकरने हुलकावणी दिली. त्यामुळे दुचाकी घसरुन आनंद भिल व त्यांचा मुलगा रस्त्याच्या कडेला फेकले गेले. तर, मागे बसलेल्या रेखाबाई या टँकरच्या मागच्या चाकात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

शिंदखेडा तालुक्यातील धावडे गाव शिवारात एमएच १२ एसयू ८८६७ क्रमांकाच्या कारने धडक दिल्याने नारायण वेडू पाटील (रा. धावडे) यांचा मृत्यू झाला. २५ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास पाटील हे शेतातून घराकडे जात होते. त्या दरम्यान त्यांना दाेंडाईचाकडून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. त्यात गंभीर होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस पाटील योगेश संजय देवरे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून कारचालकाविरुध्द दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. हेड कॉन्स्टेबल महाजन घटनेचा तपास करीत आहेत.

धुळे तालुक्यातील चौगाव शिवारात ट्रकने मागे उभ्या मजुराला चिरडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. अमोल नामदेव सैंदाणे असे मयत झालेल्या मजुराचे नाव आहे. चौगाव शिवारातील विश्वनाथ जगन्नाथ शेंडे (रा. गाळणे) यांच्या मालकीच्या नवनाथ वजन काटा येथील मोकळ्या जागेत एमएच १८ एसी ७५५५ क्रमांकाच्या ट्रकमध्ये मका पिकांचे पोते भरण्यासाठी चालकाने ट्रक निष्काळजीपणे मागे घेताना मजूर अमोल यांच्या अंगावरुन नेला. त्यात मजूर हा जागीच ठार झाला.