शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

राईनपाड्याच्या हत्याकांडातील तिसरा संशयित जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 1:41 PM

एलसीबीची कामगिरी : वार्साच्या जंगलात लपला होता

ठळक मुद्देराईनपाडा गावातील हत्याकांड दोन आरोपींनी तिसराही जेरबंदएलसीबीची धडक मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात घडलेल्या हत्याकांडातील तिसरा संशयित आरोपी दशरथ काडग्या पिंपळसे (३५) याला स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या पथकाने वार्सा येथील जंगलातून शोधून काढले़ ही कारवाई रविवारी सकाळी करण्यात आली़ त्याला अटक करण्यात आली आहे़ याप्रकरणातील पहिला आरोपी महारु वनक्या पवार आणि दुसरा हिरालाल गवळी आहे़ साक्री तालुक्यातील राईनपाडा या आदिवासी बहुल भागात रविवारी घडलेल्या सामुहिक हत्येनंतर उमटलेले तीव्र पडसाद आणि त्यामुळे लावण्यात आलेला पोलिसांचा बंदोबस्तामुळे गावात स्मशान शांतता पसरली आहे़ आठ दिवस होऊनही परिस्थिती सारखीच आहे़ वेगवेगळ्या अफवा पसरविल्या गेल्याने आणि त्या व्हायरल होत असल्याने हे पाचही निरपराध बळी ठरले़ किरकोळ वाद होणाºया गावात इतकी मोठी घटना घडल्याने त्याचे पडसाद आजूबाजूच्या पाड्यांमध्ये उमटण्यास सुरुवात झाली आहे़ राईनपाड्यासारख्या गावात कधी नव्हे इतकी मोठ्या प्रमाणात हत्याकांड झाल्याची खळबळजनक घटना घडली़ गावातील बहुसंख्य पुरुष मंडळी अगदी गाव सोडून पसार झाल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस