तिसऱ्या दिवशी नागरिक बिनधास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:36 IST2021-03-17T04:36:54+5:302021-03-17T04:36:54+5:30

जिल्ह्यात आतापर्यत ११ हजार १३५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या महानगरात आहे. सोमवारी ...

On the third day the citizen without hesitation | तिसऱ्या दिवशी नागरिक बिनधास्त

तिसऱ्या दिवशी नागरिक बिनधास्त

जिल्ह्यात आतापर्यत ११ हजार १३५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या महानगरात आहे. सोमवारी आतापर्यत बाधितांमधील सर्वाधिक बाधित रूग्ण आढळून आले आहेत. कोरोना बाधितांची संख्येत नियंत्रण मिळविण्यासाठी फेबु्वारी महिन्याच्या दुसऱ्या आठवडापासून प्रशासनाकडून उपाय येाजना राबविल्या जात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये. यासाठी लाॅकडाऊनच्या निर्णयाला व्यापारी व व्यवसायिकांनी पाठींबा दिल्याने दोन दिवसांपासून सर्वच व्यापारी व व्यवसायिकांनी दुकाने शंभर टक्के बंद ठेवली आहेत. असे असतांना मंगळवारी सर्वकाही बंद असतांना नागरिक रस्त्यावर बिनधास्त फिरतांना दिसून आले.

काॅलनी भागात लग्नांची धुम

कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी जनता कर्फ्यू जाहीर केलेले असतांना बाजारपेठ भागात दिवसभर शुकशुकाट असतो. तर काॅलनी भागात लग्नाची तयारीला वेग आला आहे. त्यामुळे रात्री ११ वाजेपर्यत नागरिक वर्दळ दिसुन येते. प्रशासनाने संसर्ग रोखण्यासाठी काॅलनी भागातही लक्ष देण्याची गरज आहे.

या भागात दिवसभर होती वर्दळ

शहरातील पाच कंदील, पारोळारोड, फुलवाला चाैक, साक्रीरोड, बारापत्थर, अग्रसेन पुतळा चाैक, साक्रीरोड, देवपूर भागातील दत्तमंदिर चाैक तसेच इंदिरा गार्डन आदी भागात तुरळक वाहतूक सुरू होती. तर काही जण परिवारासह सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी निघाले हाेते. काही भागात पोलिस नसल्याने नागरिकांचा चाैकात गर्दी दिसून आली.

पोलिसाकडून वाहनांची तपासणी

लाॅकडाऊन असतांना दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरून ये-जा करीत होते. पारोळारोड, बसस्थानक व अन्य काही ठिकाणी पोलिसांकडून मास्क लावण्यासह विचारपूस करून सोडण्यात येत होते. त्यात काही चारचाकी वाहन धारक अन्य जिल्ह्यात लाॅकडाऊन असल्याने परिवारासह घराकडे आल्याचे पोलिसाना सांगत होते.

Web Title: On the third day the citizen without hesitation