वाहनाला स्टिकर लावले का ? पेट्रोलसाठी निळे, तर डिझेल गाड्यांसाठी नारंगी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:33 AM2021-08-01T04:33:35+5:302021-08-01T04:33:35+5:30

धुळे : परिवहन मंत्रालयाने घेतलेल्या नवीन निर्णयामुळे आता वाहनांना वेगवेगळ्या रंगाचे स्टिकर दिसणार आहेत. केंद्रीय रस्ते परिवहन आणि ...

Is there a sticker on the vehicle? Blue for petrol, orange for diesel! | वाहनाला स्टिकर लावले का ? पेट्रोलसाठी निळे, तर डिझेल गाड्यांसाठी नारंगी !

वाहनाला स्टिकर लावले का ? पेट्रोलसाठी निळे, तर डिझेल गाड्यांसाठी नारंगी !

Next

धुळे : परिवहन मंत्रालयाने घेतलेल्या नवीन निर्णयामुळे आता वाहनांना वेगवेगळ्या रंगाचे स्टिकर दिसणार आहेत.

केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक निर्देशानुसार इंधनानुसार वाहनांना विशिष्ट रंगाचे स्टिकर लावावे लागणार आहेत. त्यासाठी प्रारुप स्वरूप अधिसूचना जारी झाली असली तरी अंमलबजावणीची अधिसूचना अद्याप निघालेली नाही. त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यात अंमलबजावणी झाली नसली तरी भविष्यात पेट्रोलसाठी निळे, तर डिझेल वाहनांसाठी नारंगी व इलेक्ट्रीक वाहनांसाठी हिरव्या रंगाचे स्टिकर लावले जाणार असल्याची माहिती मिळाली.

स्टिकर कुठे मिळणार ?

वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्या किंवा वाहन विक्री करणाऱ्या वितरकाकडे हे स्टिकर उपलब्ध असणार आहेत. नवीन नियमानुसार वाहन विक्री करताना वाहन कोणत्या इंधनावर चालते त्यानुसार स्टिकर दिले जाणार आहेत. या नव्या नियमाची अंमलबजावणी कधी होईल याबाबत स्पष्टता नाही.

स्टिकर नाही लावले तर ?

स्टिकर लावल्याशिवाय वाहनांची नोंदणीच होणार नाही. त्यामुळे यापुढे वाहनांना स्टिकर लावणे बंधनकारक असणार आहे. जर स्टिकर लावलेले नसेल तर वाहन विक्री करता येणार नाही. तसेच स्टिकर नसलेल्या वाहनावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

अंतिम अधिसूचना नाही -

पेट्रोल, डिझेल, सीएनजी आदी वाहनांना वेगवेगळ्या रंगाचे स्टिकर लावण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाने घेतला आहे. त्याबाबत प्रारंभीची अधिसूचना निघाली आहे. अंतिम अधिसूचना अद्याप निघालेली नाही. अंतिम अधिसूचना निघाल्यानंतरच नव्या नियमाबाबत स्पष्टता येणार आहे.

जिल्ह्यातील एकूण वाहने - ८२३४८२

पेट्रोलवर चालणारी वाहने - ६११५६३

डिझेलवर चालणारी - १९७१९८

इलेक्ट्रिक वाहने - २६४३

एलपीजी - सीएनजी वाहने - १२०७८

Web Title: Is there a sticker on the vehicle? Blue for petrol, orange for diesel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.