शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

फक्त दोन गावांनाच टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:36 IST

मात्र, गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत आहे. त्यामुळे नदी - नाल्यांसह धरणेही तुडुंब भरलेली आहेत. याचा ...

मात्र, गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत आहे. त्यामुळे नदी - नाल्यांसह धरणेही तुडुंब भरलेली आहेत. याचा परिणाम पाणीटंचाई मुक्ततेवर झालेला आहे.

सन २०१९च्या मे महिन्यात जिल्ह्यातील १२४ गावांसाठी तब्बल ८९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, यावर्षी दिलासादायक स्थिती आहे. मे २०२१च्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात फक्त दोन गावांनाच टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यात शिंदखेडा तालुक्यातील कामपूर व साक्री तालुक्यातील मळगाव डोमकाणे या दोन गावांचा समावेश आहे. दरवर्षी शिंदखेडा तालुक्याला पाणीटंचाईची सर्वाधिक झळ सोसावी लागते. मात्र, गेल्यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे अमरावती प्रकल्प, वाडीशेवाळी धरण भरलेले असल्याने, या तालुक्याचा पाण्याचा प्रश्न काहीसा मिटलेला आहे.

२९ विहिरी अधिग्रहीत

सन २०१९ मध्ये टँकरप्रमाणेच तब्बल २५० विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. मात्र, यावर्षी फक्त २९ गावांसाठी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. यात शिंदखेडा तालुक्यात ८, शिरपूर तालुक्यात ३, धुळे तालुक्यात ७ व साक्री तालुक्यातील ११ विहिरींचा समावेश आहे. दरम्यान, अजून काही गावांचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आलेले आहेत. त्यामुळे जूनपर्यंत आणखी २० - २५ विहिरी अधिग्रहीत कराव्या लागतील.

पाण्यासाठी भटकंती संपली

दरवर्षी एप्रिल - मे महिन्यात स्त्री - पुरुषांना आपले कामेधंदे सोडून तळपत्या उन्हात, रात्री केव्हाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र अनेक गावांमध्ये बघावयास मिळत होते. मात्र, यावर्षी ती परिस्थिती अजिबात नाही. काही गावांना पाणीपुरवठा उशिरा होत असला तरी टंचाई मात्र नाही, ही दिलासादायक बाब आहे.

दोन वर्षांपूर्वी ८९ टँकरने केला होता पाणीपुरवठा

सन २०१९मध्ये जिल्ह्यात भीषण दुष्काळ होता. यावर्षी टंचाईग्रस्त गावांना ८९ टँकरने पाणीपुरवठा व विहीर अधिग्रहीत करणे, यासाठी तब्बल दोन कोटी रुपये खर्च झाला होता. हा आतापर्यंतचा पाणीपुरवठ्यावरील सर्वाधिक खर्च असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात दोन वर्षांपासून झालेल्या दमदार पावसामुळे यावर्षी फारशी पाणीटंचाई नाही. आजच्या स्थितीत जिल्ह्यात फक्त दोन ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा असून, २९ विहिरी अधिग्रहीत केलेल्या आहेत.

- एस. बी. पढ्यार,

कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, धुळे