ताप, खोकला, अंगदुखी असू शकतात लक्षणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:35 IST2021-03-21T04:35:46+5:302021-03-21T04:35:46+5:30

प्रश्न - आतापर्यंत किती जणांना काेरोना लसीकरण करण्यात आले आहे ? उत्तर - देशातील पहिली स्वदेशी लस जानेवारी ...

Symptoms may include fever, cough, and body aches | ताप, खोकला, अंगदुखी असू शकतात लक्षणे

ताप, खोकला, अंगदुखी असू शकतात लक्षणे

प्रश्न - आतापर्यंत किती जणांना काेरोना लसीकरण करण्यात आले आहे ?

उत्तर - देशातील पहिली स्वदेशी लस जानेवारी महिन्यात जिल्ह्याला मिळाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात पोलीस व मनपा कर्मचारी तसेच सध्या तिसऱ्या टप्प्यात जेष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३३ हजार नागरिकांना लस देण्यात आलेली आहे.

प्रश्न : जिल्ह्याचा कोरोनाचा मृत्युदर किती आहे ?

उत्तर - आतापर्यंत जिल्ह्यातील ३९७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. असे असले तरी जिल्ह्याचा मृत्युदर ०.१३ टक्केच आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र खबरदारी घेणे तितकेचे महत्त्वाचे आहे. तरच जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट हाेऊ शकते.

प्रश्न : कोरोना तपासणी केल्यावर रिर्पोट पाॅझिटिव्ह येणार असा समज आहे?

उत्तर : सर्दी, खोकला, अंग व डोकेदुखी व घसा दुखण्याचा त्रास होणे ही कोरोनाची साैम्य लक्षणे आहेत. ही लक्षणे आढळून आल्यावर बहुतेक जण कोरोनाची तपासणी न करता घरीच उपचार घेतात. तोपर्यंत अनेक जण संपर्कात येतात. तपासणीत बाधित आढळून आल्यावर योग्य उपचार करता येऊ शकतो. व खबरदारी घेता येऊ शकते.

प्रश्न: कोरोनाची लाट थांबविण्यासाठी काय करण्याची गरज आहे ?

उत्तर : कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्याची जबाबदारी शासनाची नाही तर प्रत्येक नागरिकाची आहे. मास्क, सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टन्स ठेवणे महत्त्वाचे असताना दुर्लक्ष केेले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोचा संसर्ग वाढत आहे. प्रत्येकाने स्वत:ची काळजी स्वत:च घेतली पाहिजे. तरच आपण ही लढाई जिंकू शकतो.

Web Title: Symptoms may include fever, cough, and body aches