आरक्षणासाठी सुरू असलेल्या राजस्थानातील आंदोलनास पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 22:18 IST2019-02-15T22:17:40+5:302019-02-15T22:18:26+5:30

शिरपूर : गुर्जर समाजास ५ टक्के आरक्षणाची मागणी; प्रशासनास निवेदन

 Support for the agitation in the ongoing Rajasthan elections | आरक्षणासाठी सुरू असलेल्या राजस्थानातील आंदोलनास पाठिंबा

dhule

शिरपूर : अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेच्यावतिने राजस्थान सुरु असलेले आंदोलनाला जाहीर पाठिंबा व गुर्जर समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे यासाठी येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले़
गुर्जर समाजाला आरक्षण लवकरात लवकर देण्यात यावे, यासंदर्भात शिरपुर तालुक्यातील गुर्जर समाज व अखिल भारतीय वीर गुर्जर महासभा महाराष्ट्राच्यावतीने निवेदन दिले.
यावेळी गुर्जर परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड़शांतताराम महाजन, वीर गुर्जर महासभेचे प्रदेश अध्यक्ष विजयसिंह गुर्जर, संरक्षक अ‍ॅड मगंलसिंह चौधरी, नामदेव चौधरी, प्रकाश चौधरी, छगन गोरख गुर्जर, अविनाश जाधव, दिलीप दगडु पटेल, प्रा़व्ही.बी.पाटील, सुर्यकांत गुर्जर, राजेंद्र गुर्जर, अ‍ॅडक़मलेश जाधव, प्रशांत चौधरी, ईश्वर चौधरी, मेघराज चौधरी, दिलीप चौधरी, अतुल चौधरी, दिलीप पटेल, रमेश पटेल, तुषार चौधरी आदी उपस्थित होते.

Web Title:  Support for the agitation in the ongoing Rajasthan elections

टॅग्स :Dhuleधुळे