तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:35 IST2021-04-18T04:35:36+5:302021-04-18T04:35:36+5:30

तरुणाला मारहाण धुळे : मेहुण्यांना शिवीगाळ का केली, असा जाब विचारणाऱ्या तरुणाला लोखंडी सळईसह हाता-बुक्क्याने मारहाण करण्यात आल्याची घटना ...

Suicide of a young man | तरुणाची आत्महत्या

तरुणाची आत्महत्या

तरुणाला मारहाण

धुळे : मेहुण्यांना शिवीगाळ का केली, असा जाब विचारणाऱ्या तरुणाला लोखंडी सळईसह हाता-बुक्क्याने मारहाण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास साक्री रोडवरील यशवंतनगर भागात घडली. यात तरुणाच्या बहीण व मेहुण्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्कीदेखील करण्यात आली. याप्रकरणी सागर भावराव श्रीखंडे याने फिर्याद दाखल केल्याने चारजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

फूस लावून पळविले

धुळे : तालुक्यातील सोनगीर गावातून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना शुक्रवारी पहाटे ४ च्यासुमारास घडली. सकाळी घरातून निघालेली मुलगी बराच वेळ होऊनदेखील परत न आल्यामुळे तिचा शोध घेण्यात आला. ती मिळून आली नाही. तिचे कोणीतरी अपहरण केले असावे, अशी शक्यता गृहीत धरून मुलीच्या आईने सोनगीर पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Suicide of a young man