दहावी, बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना मिळणार गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:24 IST2021-06-11T04:24:50+5:302021-06-11T04:24:50+5:30

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, धुळे अंतर्गत २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावीच्या ...

Students of 10th and 12th classes will get marks | दहावी, बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना मिळणार गुण

दहावी, बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना मिळणार गुण

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, धुळे अंतर्गत २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा गुण देण्यासाठी विभागीय शिक्षण मंडळाकडे शिफारस करण्यात येणार आहे. त्यासाठी या शैक्षणिक वर्षात दहावीच्या खेळाडूंसाठी मागील आठवी व नववीच्या वर्गात शिक्षण घेत असताना जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेची प्रमाणपत्रे क्रीडा गुणांच्या सवलतीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. तसेच बारावीच्या खेळाडूंसाठी मागील अकरावीमध्ये शिक्षण घेत असताना जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेची प्रमाणपत्रे क्रीडा गुण सवलतीसाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. या स्पर्धांच्या प्रमाणपत्रानुसार धुळे जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांनी खेळाडूंचे द्विप्रतीतील प्रस्ताव १७ जूनपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. त्यानंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, धुळे येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी, धुळे यांनी केले आहे.

Web Title: Students of 10th and 12th classes will get marks