कमी मनुष्यबळामुळे कामावर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:37 IST2021-04-07T04:37:02+5:302021-04-07T04:37:02+5:30

मालपूर येथे दररोज कोरोनाबाधित रुग्णांची दररोज भर पडत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रॅपिड अँटिजन अहवालात ...

Stress at work due to low manpower | कमी मनुष्यबळामुळे कामावर ताण

कमी मनुष्यबळामुळे कामावर ताण

मालपूर येथे दररोज कोरोनाबाधित रुग्णांची दररोज भर पडत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रॅपिड अँटिजन अहवालात दिवसागणिक सहा- सात रुग्ण बाधित रुग्ण निघत असल्याने आता येथील आरोग्य यंत्रणेवर कामाचा खूप मोठा बोजा वाढलेला. गाव कोरोना हाॅटस्पाटच्या दिशेने मार्गक्रमण करत असल्यामुळे वरिष्ठांनी याची दखल त्वरित मनुष्यबळाचा पुरवठा करावा.

मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला मालपूरसह वाडी, सतारे, सुराय, कर्ले, परसोळं, देवी, वाडी, रुदाणे, गैरमहसुली देवकानगर, कलवाडे, चुडाणे, आदी गावे जोडली आहेत. यात देवी व मालपूर येथील मोहनशेठनगरात दोन उपकेंद्र कार्यान्वित आहेत. सुराय व कर्ले येथे देखील त्वरित आरोग्य उपकेंद्राची निर्मिती करावी.

मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात अपुरे मनुष्य बळ

मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात अपुरे मनुष्यबळ असून त्यात नियमित सेवा, लसीकरण कार्यक्रम, कोरोना लसीकरण, कोरोना सनियंत्रणची कामे करण्यासाठी मोठा ताण पडत आहे, असे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र पाटील यांनी सांगितले.

Web Title: Stress at work due to low manpower