शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

साठवून ठेवलेला कांदा सडू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:42 IST

गतवर्षाप्रमाणे यंदाही पौर्णिमेनंतर बाजारभाव निश्चित वाढतील. या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. गतवर्षी चाळीत साठविलेल्या उन्हाळी कांद्याला विक्रमी ...

गतवर्षाप्रमाणे यंदाही पौर्णिमेनंतर बाजारभाव निश्चित वाढतील. या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. गतवर्षी चाळीत साठविलेल्या उन्हाळी कांद्याला विक्रमी बाजारभाव मिळाल्यामुळे चालू वर्षी देखील कांद्याला चांगला दर मिळेल म्हणून मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवला होता. परंतु कांद्याच्या बाजारभावातील अस्थिरतेमुळे चाळीतील उन्हाळी कांदा विकण्यासंदर्भात शेतकरी संभ्रमात आहेत. अनेक शेतकऱ्यांना कांदा विक्री करण्यासंदर्भात निश्चित निर्णय घेता येत नाही. त्यातच मोठ्या अपेक्षेने चाळीत साठवणूक केलेला कांदा सडू लागला असून, काही शेतकऱ्यांचे चाळीतील कांदा संपूर्ण सडल्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सहा ते सात महिने चाळीत टिकणारा कांद्याला चालू वर्षी वातावरणात होणाऱ्या बदलांचा चांगलाच फटका बसला आहे. कांदा सडू लागल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता नाइलाजाने चाळीत साठवणूक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीकरिता जात असल्यामुळे बाजारात कांद्याची आवक वाढू लागली आहे. अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पोळ कांद्याचे बियाणे शेतात टाकले होते. वातावरणात अचानक होणारे बदल व नुकत्याच झालेल्या रिमझिम पावसामुळे रोपे खराब झाली असून, या शेतकऱ्यांना पुन्हा महागडे बियाणे उपलब्ध करावे लागणार आहे.

*प्रतिक्रिया*

महिनाभरातच कांदा सडू लागल्याच्या तक्रारी

दरवर्षी डिसेंबरपर्यंत चाळीत टिकणारा कांदा चालू वर्षी चाळीत टाकल्यानंतर महिनाभरातच सडू लागल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. परंतु कांद्याचे दर वाढण्याच्या अपेक्षेने शेतकरी होणारे नुकसान सहन करीत होते. परंतु वातावरणातील बदलामुळे कांदे सडण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली व संपूर्ण नुकसान होण्यापेक्षा शाबूत असलेला कांदा विकून मिळेल ते पदरात पाडून घेण्याचा दृष्टिकोन ठेवत शेतकयांनी चाळीतील कांदा बाजारात विक्रीसाठी आणण्यास प्रारंभ केला आहे.

समाधान ढिवरे , शेतकरी , ऐचाळे

2) उन्हाळी कांदा बियाणांत झालेली फसवणूक, सर्वत्र तुटवडा असल्यामुळे नाईलाजाने अव्याच्या सव्वा किमत मोजून खरेदी केलेले नित्कृष्ट काटा बिर कांद्याची रोपे खराब झाले. अवकाळी पावसामुळे कांद्याच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम झाला.

सरदार खटा पाटील , शेतकरी ,बळसाणे