शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

जातोडा, भोरखेडा येथे लसीकरण सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:35 IST

जातोडा येथे आरोग्य उपकेंद्र नावालाच आहे की काय? अशी शंका परिसरातील नागरिक करीत आहेत. तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार ...

जातोडा येथे आरोग्य उपकेंद्र नावालाच आहे की काय? अशी शंका परिसरातील नागरिक करीत आहेत. तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. प्रशासन म्हणते, कोरोनाची लस घ्या तसेच घराबाहेर पडू नका, असेही सांगते. आता लोकांनी करायचे काय? परिसरातील लोक सांगवी, वाडी, रोहिणी व दहिवद येथील आरोग्य केंद्रांत लसीकरणासाठी जात आहेत. ज्याच्याकडे जाण्यासाठी साधन नाही, त्यांनी कसे जावे? म्हणूनच जातोडा आरोग्य उपकेंद्रात लवकरात लवकर कोरोना लसीकरण चालू करावे़.

जेणेकरून परिसरातील लोकांना कोरोना काळात लांब बाहेर गावी न जाता परिसरातच लस घेता येईल़. कोरोनाचा संभाव्य धोका टाळता येईल, तशी मागणी परिसरातील बोरगाव येथील उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी केली आहे.

भोरखेडा येथे लसीकरण

भोरखेडा गावात कोरोना लसीकरण केंद्र सुरू करा़. या गावातील लोकसंख्या मोठी आहे़ तसेच असली, गोदी, सावेर हे गाव २ किमी अंतरावर आहेत़, तसेच थाळनेर उपकेंद्रात जाण्यासाठी लोकांना वाहन व्यवस्था नसल्यामुळे हाल होत आहे़त. त्यासाठी भोरखेडा गावात ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांची नेमणूक आहे, ते आशावर्कर्स व नर्सच्या माध्यमातून भोरखेडा जिल्हा परिषद शाळेत किंवा सोसायटीच्या ऑफिसात लसीकरणाची सोय करता येऊ शकते. तसे झाल्यास लसीकरणाचा जास्तीत-जास्त लोकांना फायदा होईल़. त्यामुळे या भोरखेडा गावात तातडीने लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे तालुका उपाध्यक्ष सुरेंद्र उदेसिंग राजपूत यांनी केली आहे़

भोरखेडा गावात मागील १ महिन्यात १७ ते १८ लोकांचा मुत्यू झाल्याने गाव घाबरलेले आहे. म्हणून लसीकरण करून गावातील लोकांना दहशतमुक्त करण्यास मदत होईल़.