शटल सेवा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:34 IST2021-04-15T04:34:50+5:302021-04-15T04:34:50+5:30

वेळापत्रक बदलवा दोंडाईचा : येथील बसस्थानकात असलेले वेळापत्रक हे जुनेच आहे. कोरोनानंतर अनेक बसगाड्या सुरू झाल्या असून, त्यांच्या वेळांमध्येही ...

Start the shuttle service | शटल सेवा सुरू करा

शटल सेवा सुरू करा

वेळापत्रक बदलवा

दोंडाईचा : येथील बसस्थानकात असलेले वेळापत्रक हे जुनेच आहे. कोरोनानंतर अनेक बसगाड्या सुरू झाल्या असून, त्यांच्या वेळांमध्येही बराच फरक पडलेला आहे. त्यामुळे येथील बसस्थानकातील वेळापत्रक बदलवून ते अद्ययावत करण्यात यावे, अशी प्रवाशांची मागणी आहे.

भाजी विक्रेत्यांना जागा द्यावी

धुळे : शहरातील जुन्या सिव्हिल रुग्णालयासमोर काहीजण भाजी विक्री करीत असतात. भाजी घेण्यासाठी येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करीत असल्याने, त्याचा इतर वाहनांना त्रास होत असतो. त्यामुळे या विक्रेत्यांना दुसऱ्या ठिकाणी जागा दिसल्यास या रस्त्यावर होणारी कोंडी टळू शकणार आहे.

विद्युत पोल बदला

धुळे : शहरातील काही भागांमध्ये विद्युत खांब अतिशय जीर्ण झाले आहेत. हे विजेचे खांब पडून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खराब झालेले विजेचे खांब बदलण्याची मागणी होत आहे. विजेचे खांब बदलण्यासाठी वीज कंपनीने आर्थिक तरतूद करावी.

Web Title: Start the shuttle service