पत्रकबाज विरोधकांच्या निषेधाचा स्थायीत ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:38 IST2021-04-23T04:38:18+5:302021-04-23T04:38:18+5:30

येथील महापालिकेच्या सभागृहात स्थायी समितीची बैठक सभापती संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली़ यावेळी अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, नगरसचिव ...

Standing resolution of protest of journalist opposition | पत्रकबाज विरोधकांच्या निषेधाचा स्थायीत ठराव

पत्रकबाज विरोधकांच्या निषेधाचा स्थायीत ठराव

येथील महापालिकेच्या सभागृहात स्थायी समितीची बैठक सभापती संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली़ यावेळी अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह नगरसेवक शीतल नवले, अमोल मासुळे, नागसेन बोरसे, अमिन पटेल, कमलेश देवरे, सुनील बैसाणे, नगरसेविका किरण कुलेवार, भारती माळी आदी उपस्थित होते़

शीतल नवले, सुनील बैसाणे, अमोल मासुळे यांनी नाशिक येथील ऑक्सिजनअभावी झालेल्या दुर्घटनेचा संदर्भ घेत धुळ्यात महापालिकेच्यावतीने ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची मागणी केली़ मनपाचा स्वत:चा मोठा दवाखाना नसला तरी मनपाच्या जागेवर आपण हा प्रकल्प उभारू शकतो़ कोरोनाची तिसरी लाट येण्याअगोदरच प्रशासनाने तयार केल्यास ते उपयुक्त ठरणारे असेल, असेही त्यांनी सांगितले़

ठेका रद्द करा : नवले

हिरे वैद्यकीय महाविद्यालयाजवळील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी आस्था स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या काही कर्मचाऱ्यांनी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून अवाजवी पैसे घेतले़ वास्तविक या संस्थेचा कालावधी संपलेला आहे़ या संस्थेबाबत सदस्य वारंवार तक्रारी करीत आहेत़ परंतु प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही, याचे दु:ख आहे़ परिणामी संस्थेचा ठेका आजच्या आज रद्द करून त्या संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि नवीन निविदा काढण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक शीतल नवले यांनी केली़

निषेधाचा ठराव

पत्रकबाजी करणाऱ्यांकडून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांची बदनामी केली जात असते़ कोरोनाच्या काळात सुरुवातीपासून गोरगरिबांपर्यंत अन्न पोहचविण्याचे काम भाजपने केले आहे़ या कामात कोणत्याही प्रकारचे राजकारण नसताना केवळ पत्रके काढून दिशाभूल केली जात आहे़ हा बदनाम करण्याचा प्रयत्न असून अशा पत्रकबाजांचा समाचार घेत त्यांचा निषेध नोंदविण्याचा ठराव बैठकीत पारित करण्यात आला़

ठेकेदारासह यंत्रणाही गायब

कमलेश देवरे यांनी सांगितले, देवपूर परिसरात भूमिगत गटारीचे काम सुरू आहे़ या कामांसाठी अनेक ठिकाणी पाईपलाईनसाठी मोठमोठ्या चऱ्या खोदल्या आहेत़ बऱ्याच ठिकणी पाईपलाईन फुटल्या आहेत़ गेल्या महिनाभरापासून ठेकेदारासह त्यांची यंत्रणा कुठेही दिसून येत नाही़ ते गायब झाले असल्याचे समोर येत आहे़ खड्डे सुध्दा बुजलेले नाही़ परिणामी त्या त्या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत़ महापालिका पदाधिकाऱ्यांवर नाराज आहेत़ वारंवार मागणी करूनही त्यांच्यावर काहीही कारवाई होताना दिसत नाही़ यावर पुढच्या बैठकीत एमजीपीचे अधिकारी, ठेकेदार यांना प्रत्यक्ष बोलावून विषय मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन सभापती जाधव यांनी दिले़

Web Title: Standing resolution of protest of journalist opposition