शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार घरांना बसविले स्मार्ट कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 15:19 IST

देशात पहिल्यांदा उपक्रम : स्वच्छता देखरेख प्रणाली, पहिल्या टप्यात कामाकाजाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शासनाच्या प्रत्येक योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी महापालिकेकडून देशात पहिल्यादा प्रत्येक घरांना स्वच्छता देखरेख प्रणाली (आरएफआयडी) स्मार्ट कार्ड बसविण्यात निर्णय घेण्यात आला आहे़ त्यानुसार पहिल्या टप्यात देवपूर भागातील २ हजार ८४४ घरांना डिजीटल चीप बसविण्यात आली आहे़ त्यासाठी सध्या चाळीस कर्मचारी कार्यरत आहे़ दरम्यान दोंडाईचा, शिंदखेडा, शिरपूरनंतर धुळे शहरात पहिल्यांदा राबविणारी देशातील पहिली महापालिका ठरणार आहे़मालमत्ता होईल स्मार्टप्रत्येक घरांना डिजीटल चीप बसविण्यासाठी इंदूर येथील समाधान टेक्नॉलॉजी कंपनीला १ कोटी ७२ लाख ८४ हजार ४० रूपयांचा ठेका देण्यात आला आहे़ त्यानुसार शहरातील ७० ते ८० हजार मालमत्ता धारकांच्या घराबाहेर आरडीएफआय चीफ बसविण्यात येणार आहे़ एका घरासाठी प्रत्येकी २१६ रूपये किंमत मनपाला ठेकेदाराला द्यावी लागणार आहे़ तर देखभार दुरूस्तीसाठी तीन वर्षापर्यत जबाबदारी इंदूर येथील समाधान टेकनॉलॉजीस कंपनीकडे सोपविण्यात आली आहे़ दरम्यान चार महिन्यापासुन कंपनीकडून शहरात सर्व्हेक्षण करण्यात येत होत़सर्व्हरद्वारे मिळेल माहितीप्रत्येक प्रभागातील नागरिकांची घरांना बसविण्यात आलेल्या स्मार्ट कार्डचा एकत्रित डाटा संग्रहित करण्यासाठी महापालिकेत मुख्यसर्व्हर बसविण्यात येणार आहे़घंटागाडीवर देखील वॉचघरापर्यत घंटागाडी पोहचत नसल्याची तक्रारी सोडविण्यासाठी घराबाहेर ही चीफ बसविण्यात येणार आहे़ त्यामुळे तुमच्या घरासमोरून केव्हा व किती वाजता कोणती घंटागाडी गेली याची माहिती मनपाला मिळणार आहे़ तर प्रभागात येणाऱ्यास घंटागाडी वेळ, मार्ग, ठिकाणाची माहिती मिळण्यासाठी नागरिकांना स्मार्टकार्डवरील बारकोड मोबाईलने स्कॅन केल्यास सविस्तर माहिती मिळू शकते़ तसेच तक्रारी देखील दाखल करता येवू शकते़देशात पहिली महापालिकादेशात पहिल्यांदा शिरपूर, दोंडाईचा, शिंंदखेडा या तीन शहरानंतर आता धुळे शहरात प्रत्येक घरांना स्मार्ट कार्ड बसविण्यात येत आहे़ या प्रणालीचा वापर करणारी धुळे मनपा देशातील एकमेव ठरणार आहे़घंटागाडीला जीपीएस प्रणालीघंटागाडी कुठे आहे याची अद्ययावत माहिती ठेवण्यासाठी प्रत्येक वाहनाला जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम बसविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे़ त्यामुळे आवश्यकता भासल्यास चालकाशी संपर्क साधता येणार आहे़ घंटागाड्यांच्या सायरनमुळे नागरिकांना पूर्व सूचना मिळते. त्यामुळे शहरातून १०० टक्के कचरा संकलन करणे शक्य झाले आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी त्यांना मास्क, हॅण्ड ग्लोज देण्यात आले आहेत.विनामुल्य स्मार्टकार्डनवीन चीप ही विनामुल्य असणार आहे़ यासाठी कोणताही खर्च नागरिकरांकडून घेतला जाणार नाही़ त्यासाठी सध्या ४० कर्मचारी कंपनीकडून नियुक्त करण्यात आले आहे़ त्यांच्याकडून हे कार्ड बसविण्यात येत आहे़ त्यानंतर लवकरच संपुर्ण शहरात हे कार्ड बसविण्यात येईल़

 

टॅग्स :Dhuleधुळे