शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात नियम तोडणाऱ्या तरूणांना बसला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 12:06 IST

साठेबाजी करणे पडू शकते महागात : घराबाहेर निघू नका, घरातच थांबण्याचे प्रशासनाचे आवाहन

धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबण्यासाठी सोमवारी संचार बंदी लागु केली आहे़ नागरिकांना वेळोवेळी घरात बसण्याचे आवाहन केले जात असतांना आदेशाचे उल्लंघन करीत शहरात मनोरंजनासाठी शहरात मोटारसायकलवर फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या तरूणांना मंगळवारी पोलिसांनी चांगला चोप दिला़शासनाने जाहीर केलेल्या संचार बंदी लागु केली आहे़ या काळात नारिकांना जीवनावश्यक वस्तुंच्या खेरदीसाठी वेळ देण्यात आला आहे़ मात्र देण्यात आलेला वेळ व संचार बंदीचे उल्लंघन करून रस्त्यावर बिनस्थान फिरणाºया दुचाकीस्वारांना भर उन्हात पोलिसांचा चांगलाचा मार खावा लागला़ तर संचारबंदीचा आदेश न पाळल्याने उन्हात बैठका माराव्या लागल्यात़ तर काहीच्या दुचाकीची हवा पोलिसांनी काढल्याने धक्के मारून दुचाकी घराकडे घेऊन जावी लागली होती़ दरम्यान शहरातील चौका-चौकात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़दिवसा रस्त्यावर शुकशुकाटनागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, यासाठी आवाहन करण्यात आलेले असतांना मंगळवारी सकाळी ८ वाजता भाजीपाला, जीवनावश्यक वस्तुच्या खरेदीसाठी आग्रारोड व पाचंकदील परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती़ त्यामुळे गर्दी पागविण्यासाठी पोलिसांना कठोर भुमिका घ्यावी लागली होती़ त्यांनतर तासाभरात गर्दी कमी झाली़पेट्रोल पंप दुपारी बंदसकाळी पेट्रोल पंपावर नागरिकांनी गर्दी दिसुन आली मात्र दुपारी दोन वाजेनंतर पेट्रोल पंप बंद असल्याने परिसरात शुकशुकाट दिसुन आला़ तर दुचाकी, चारचाकी किंवा खाजगी वाहने देखील रस्त्यावर फिरत नसल्याने गल्ली बोळातील रस्ते ओस पडले होते़साठवणुक केल्यास कारवाईकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात कलम १४४ लागू केले आहेत. या आदेशातून जीवनावश्यक वस्तू गहू तांदूळ, डाळ, कडधान्य, खाद्यतेल , दूध, बेकरी पदार्थ, फळे व भाजीपाला आदी वस्तुंना वगळले आहे.जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पुरेल इतका अन्नधान्य साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच शासनाने एप्रिल मे व जून महिन्याचे धान्य एकदाच वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व रास्त भाव दुकानदार, धान्याच्या घाऊक व अर्ध घाऊक व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांना, खाद्यतेल व डाळींचे व्यापारी व इतर जीवनावश्यक वस्तूचा व्यापार करणाºया सर्व व्यापाऱ्यांना विनंती आहे़ या काळात कोणत्याही प्रकारचे साठेबाजी करू नये. वस्तूंचे कृत्रिम भाव वाढवून नफे खोरी करण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासन या सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. साठवणूक केल्यास किंवा अवाजवी भावात विकणाºयाविरुद्ध जीवनावश्यक वस्तू प्रतिबंधक व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाईचा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी दिला.

टॅग्स :Dhuleधुळे